मूल – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, जि.प.चे माजी अध्यक्ष तथा हनुमान मंदिर समितीचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी मातोश्री स्व. कमलादेवी चंदनसिंह रावत यांचे स्मृती प्रित्यर्थ मूल येथील बस स्थानक परीसरात निर्माण केलेल्या श्री हनुमान मंदिरात स्थापीत केलेल्या श्री साईबाबा मूर्तीला २० वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्ताने रविवार ११ जून २०२३ रोजी श्री साई मुर्ती स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री हनुमान मंदीर देवास्थान आणि श्री साई भक्ती सेवा समिती मुल यांचे संयुक्त विद्यमाने संतोषसिंह रावत यांचे मार्गदर्शनात श्री साईबाबा मूर्ती अभिषेक, भजन, गोपाल काला, साई पालखी शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले. या निमित्त मूल शहरातील भक्तगण व बस स्थानक येथील हजारो प्रवाश्यांना महाप्रसाद व जिलेबीचे वाटप करण्यात आले. यावेळी संतोषसिंह रावत, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, श्री साई भक्ती सेवा सामितीचे विवेक मुत्यलवार, अध्यक्ष राजु करपे, तालुका काँग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, उपाध्यक्ष एकनाथ पाटील, सचिव विष्णू सादमवार, कोषाध्यक्ष केशव गुज्जनवार, कार्यवाह नवाब पठाण, सहसचिव विजय बटे, संजय टिकले, यांचेसह साई भक्ती सेवा समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी महाप्रसादाचे वितराण केले. स्थापना दिन आयोजनासाठी समितीचे सदस्य संदीप कारमवार, राजेंद्र कन्नमवार, गणेश पडगेलवार, निलेश राँय, वासुदेव दिघोरे, प्रशांत नंदीग्रामवार, प्रथम रेगुंडवार, सुमित गुडलावर,रमेश चिलके, प्रेमसेठ चुगानी, पी.एम. रक्षमवार, अभिजित चेपुरवार, मनोज गुज्जनवार बादल करपे, लवणीश उधवाणी, सुमित नैताम, रणजित समर्थ, सागर वट्टमवार आदींनी परिश्रम घेतले.