शिक्षक आमदार अडबाले यांनी घेतले सपत्नीक दुर्गा देवीचे दर्शन, मंदीराच्या वर्धापन दिनी दिला १० लाख रूपयाचा निधी

66

मूल – श्री माँ दुर्गा मंदीर सेवा समिती निर्मित श्री माँ दुर्गा मंदीराचा सातवा वर्धापन दिन विविध धार्मीक उपक्रमाने नुकताच पार पडला. यावेळी नवनिर्वाचित शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी सपत्नीक दुर्गा देवीचे दर्शन घेवुन अभिषेक सोहळ्यात सहभाग घेतला. आ.सुधाकर अडबाले यांचे सपत्नीक मंदिर परीसरात आगमन होताच मंदीर समितीचे अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा जि.प. चे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी मंदिर समितीच्या वतीने पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. यावेळी आ. सुधाकर अडबाले यांनी मंदीर परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त करताना परीसराचा विकास करण्यासाठी स्थानिक विकास निधी मधुन १० लाख रूपयाचा निधी देण्याचे आश्वासन दिले. यावेळी मंदिर समितीचे उपाध्यक्ष तथा न.प.चे माजी उपाध्यक्ष राकेश रत्नावार, सचिव संजय पडोळे, सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती घनश्याम येनुरकर, सदस्य तथा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गुरु गुरनुले, शहर काँग्रेस अध्यक्ष सुनील शेरकी, विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष संदीप कारमवार, संचालक राजेंद्र कन्नमवार, प्राथामिक सह.सोसायटीचे अध्यक्ष धनंजय चिंतावार, सामाजिक कार्यकर्ते तथा मंदीर समितीचे सदस्य राजू पाटील मारकवार, माजी नगर सेवक विनोद कामडे, हसन वाढई, रुपलसिंह रावत, कैलास चलाख, सुरेश फुलझेले, चतुर मोहुर्ले, केदारनाथ कोटगले, आदी सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here