पाठलाग करून लाखो रूपये लंपास करणारे पोलीसाच्या गळाला, दहा महीण्यांपुर्वी गोयल यांच्या दोन दिवाणजींना मार्गावर मारहाण करून केली होती रक्कम लंपास

107

मूल : उधारीची रक्कम वसुली करून दुचाकीने परत येत असलेल्या दिवाणजीचा दुचाकीने पाठलाग करून दुचाकीचे हॅण्डल पकडून खाली पाडले व मारहाण करून रोकड लंपास केल्याच्या कारणावरून दोन आरोपींना पकडण्यांत जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. तब्बल दहा महिण्याने गळाला लागलेल्या दोन आरोपींना सावली येथील दिवाणी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

स्थानिक दिनेश गोयल यांच्या महालक्ष्मी ट्रेडींग कंपनीची जिल्हयातील विविध गांवामधून वसूली करून दिनेश चलाख आणि अक्षय गोवर्धन नामक दिवाणजी मूल कडे परत येत असतांना १६ मार्च २०२२ रोजी ८.४५ ते ९ वाजताचे दरम्यान मूल चंद्रपूर मार्गावरील डोणी फाटयाजवळ दोन अज्ञात व्यक्ती पाठीमागेहून मोटार सायकलने येवून दिनेश चलाख यांच्या मोटार सायकलचे हॅण्डल पकडुन चलाख आणि गोवर्धन यांना खाली पाडून त्यांना मारहाण केली व चलाख यांचे जवळील १८ लाख ९३ हजार ५२० रूपयाची बॅग हिसकावून पळून गेले. सदर घटनेची पोलीसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस विभागाने युध्दपातळीवर तपास केला. अज्ञात आरोपींच्या शोधासाठी पोलीसांची वेगवेगळी पथके तयार करून सर्वत्र शोध घेण्यांत आला. परंतू आरोपी गळाला लागत नव्हते. दरम्यान मूल शहरात घडलेल्या एका मारहाणीच्या घटनेवरून सदर प्रकरणाचे रहस्य पोलीसांच्या कानावर पडले. त्याआधारे चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी सहकारी सपोनि जितेंद्र बोबडे, पोलीस कर्मचारी नितीन साळवे, प्रकाश बल्की, प्रमोद डंबारे, सुभाष गोहोकार, सतिश बगमारे यांचे सहकार्याने पाळत ठेवून मूल येथील केतन अशोक बुटले (२३) व तोहीद आरीफ शेख (२४) यांना ताब्यात घेवून सदर प्रकरणाची चौकशी केली, तेव्हा केतन बुटले आणि तोहीद शेख यांनी सदर गुन्हा केल्याचे मान्य केले. केतन बुटले आणि तोहीद शेख यांच्या तोंडी बयाणावरून त्यांचे विरूध्द भादवी ३९४ अन्वये गुन्हा दाखल केल्यानंतर सदर प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी केतन बुटले आणि तोहीद शेख यांना पोलीस कोठडी घेण्यासाठी मूल येथील न्यायालय अवकाश काळात असल्याने सावली येथील न्यायालयात आज हजर केले. तेव्हा सावली न्यायालयाने केतन बुटले आणि तोहीद शेख यांना २४ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा दिली. सदर गुन्हयात जिल्हा गुन्हे शाखेने दोघांना ताब्यात घेतले असले तरी वनकर नामक व्यक्तीचाही सदर गुन्हयात सहभाग असल्याने त्यालाही ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. परंतू प्रकृतीचे कारण समोर करून आज केवळ बुटले आणि शेख या दोघांनाच न्यायालयात हजर करण्यांत आले. त्यामूळे सदर प्रकरणात पुन्हा काही म्होरके सहभागी आहेत कि काय ? अशी शंका व्यक्त केल्या जात आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेसी यांचे मार्गदर्शनात चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखा पथक करीत आहे.

गोयल यांच्या दिवाणजीकडून लंपास केलेल्या १८ लाख ९३ हजार मधून केतन बुटले आणि तोहीद शेख यांचे कडून पोलीसांनी ४ लाख रूपये किंम्मतीची वरणा चारचाकी, २.५० लाख किंमतीची खाकी रंगाची एक जुनी बुलेट मोटार सायकल, १ लाख किंमतीची एक मारोती ८०० चार चाकी वाहणा यांचेसह गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकुण साडे सात लाखाचा ऐवज हस्तगत केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here