व्हाईस आँफ मिडीयाची तालुका कार्यकारणी गठीत, तालुकाध्यक्षपदी मंगेश पोटवार यांची निवड

64

मूल : लढा पञकारीता आणि पञकारांसाठीचा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवुन ज्येष्ठ आणि अभ्यासु संपादक संदीप काळे आणि सहका-यांनी निर्माण केलेल्या व्हाईस आँफ मिडीयाचे नागपुर विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांनी मूलच्या तालुकाध्यक्षपदी मंगेश पोटवार यांची निवड केली आहे.
मूल येथील दे धक्का एक्सप्रेस कार्यालयात पार पडलेल्या सभेत तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी आयोजीत केलेल्या सभेला जिल्हा कार्याध्यक्ष गुरूदास गुरनुले, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख भोजराज गोवर्धन उपस्थित होते.
यावेळी गठीत केलेल्या कार्यकारणीमध्ये कार्याध्यक्षपदी शशिकांत गणवीर, सरचिटणीसपदी दुर्योधन घोंगडे, उपाध्यक्षपदी प्रदीप वाळके, कोषाध्यक्षपदी प्रकाश चलाख, सहसरचिटणीसपदी प्रशांत मेश्राम, संघटकपदी मंगेश नागोशे, कार्यवाहकपदी धर्मेंद्र सुत्रपवार, प्रसिध्दीप्रमुखपदी संगिता गेडाम, तर सदस्यपदी शाम पुट्टावार, गुलशन लाकडे यांची निवड करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिका-यांचे जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, कार्याध्यक्ष गुरूदास गुरूनुले, संघटक विनायक रेकलवार, प्रसिध्दीप्रमुख भोेजराज गोवर्धन, सदस्य रमेश माहुरपवार यांचेसह अनेकांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here