मुल (प्रतिनिधी) पहिलेच शेतकरी कर्जबाजारी असून आर्थिक अडचणीचा सामना करण्याची शक्ती शेतकऱ्यांत राहिलेली नाही. अशा अवस्थेत शेतकरी जगत असताना यावर्षीचा धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हाती येऊन तोंडात घास येईल या आशेवर असताना ऐन धानाचे लोंब भरते वेळीच त्यावर कडा करपा व खोड किडा रोग लोंबावर लागल्याने याहीवर्षी शेतकऱ्यांच्या तोंडात येणारा घास गेल्याचे शेतकऱ्याला दिसून येत असल्याने मुल सावली तालुक्यातील शेतकरी खचला आहे. यावर्षी आवश्यकते पेक्षा अती पाऊस पडल्याने धान पीक रोवणी केल्यावरच बुडा पासून रोपे सडले त्यामुळे शेतकऱ्याला पातळ रोवणी करावी लागली त्यातही सुरवातीलाच १० टक्के नुकसान झाली. आणि उरलेली ९० टक्के पीक हाती येत असताना जाण्याच्या मार्गावर दिसून येत असल्याने शेतकरी बांधव बेजार हवालदिल झाला आहे. मुल सावली तालुक्यातील शेतकरी मागील तीन वर्षातील पीक कर्जाची रक्कम मुदतीच्या आत भरणा केला आहे. परंतु आता नुकतेच शिंदे – फडणविस सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी धोरणानुसार त्यांना प्रोत्साहन अनुदान ५० हजार रुपये मंजूर केले खरे परंतु मुल येथे फक्त ८ शेकऱ्यांचे खात्यात रक्कम जमा केल्याचे सोसायटी कडून सांगण्यात आले. नियमित पीक कर्ज भरणारे दोन्ही तालुक्यातील शेकडो शेतकरी यांचे यादीत नाव नसल्याने आमच्या खात्यात केव्हा प्रोत्साहन अनुदानाची रक्कम जमा होईल असे विचारणा शेकडो शेतकरी करायला गेले तेव्हा तुमच्या नावाची यादीच आम्हाला आलेली नाही असे उत्तर सहकारी सोसायटी व बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिल्याने शेतकरी पुन्हा नाराज झाले आहे. अशा अंवस्थेमधे शेतकरी असतांना शासन व लोकप्रतिनिधी आमदार व खासदार संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देतील का. असा प्रश्न धानाला रोग लागलेल्या अनेक दुष्काळ ग्रस्त शेतकरी बांधव यांनी केला आहे.
Latest article
How to Access FL Studio Through Unauthorized Channels
Download Fl Studio Crack
When exploring FL Studio, many users come across cracked, hacked, or pirated versions of the software. These unauthorized and unlicensed copies...
वाघाच्या हल्यात गुराखी ठार, तालुक्यातील काटवन जंगलातील घटना
मूल : तालुक्यातील काटवन जंगलातील कक्ष क्र. ७५६ मध्ये शेळ्या चारण्या करीता गेलेल्या चिचोली येथील देवाजी वारलु राऊत (५०) ह्याचेवर हल्ला करून नरभक्षी वाघाने...
प्रशासनाच्या बघ्याच्या भुमीकेत गणपती विसर्जन शांततेत
मूल : गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या म्हणत शहरातील गणपती विसर्जन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शांततेत पार पडले. परंतू प्रशासनाच्या दुर्लक्षामूळे गांधी...