मूल : गांवालगतच्या शेतात कापुस वेचत असताना वाघाने हल्ला करून सावली तालुक्यातील खेडी येथील महीला स्वरूपा प्रशांत येलट्टीवार हिला ठार केल्याची घटना आज दुपारी १२ वा. चे सुमारास घडल्याने तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सावली पासुन ४ कि.मी. अंतरावरील खेडी येथील मृतक महीला व स्वरूपा प्रशांत येलट्टीवार, वय ५० वर्षे ही गांवापासुन अवघ्या दिड कि.मी. अंतरावर आसलेल्या विकास कटकमावार यांच्या शेतात नेहमी प्रमाणे सहकारी महीलांसोबत कापुस वेचण्याकरीता रोजीने गेली होती. कापुस वेचुन थकवा आल्याने दुपारी १२ वा.चे सुमारास सर्व महीला शेताच्या पाळीवर विश्रांती घेत बसल्या असतांना मृतक स्वरूपा येलट्टीवार ह्या बाजुच्या शेतात लघुशंकेला गेली. त्याच दरम्यान शेताच्या पाळीखाली दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने तिचेवर हल्ला करून फरफटत नेले. वाघाने हल्ला करताच स्वरूपा किंचाळु लागल्याने सहकारी महीलांनी सोबतचे पिपे वाजविले व सुटकेसाठी आरडाओरड केल्याने शेवटी वाघाने स्वरूपाला मध्येच टाकुन पळ काढला. तोवर स्वरूपाचा बळी गेलेला होता. सदर घटनेची माहीती स्वरूपाच्या कुटूंबियासह ग्रामस्थांना कळविण्यात आल्यानंतर ग्रामस्थांनी वनविभागा विरूध्द संताप व्यक्त केला. घटनेची माहीती होताच वनविभाचे आधिकारी आणि पोलीस अधिकारी सहका-यांसह घटनास्थळी पोहोचुन शासकीय सोपस्कर पुर्ण केले. मृतक स्वरूपाचे पश्चात पती,वृध्द आई, मुलगा मुलगी आहेत. वनाधिका-यांनी मृतकाच्या पतीस नियमानुसारची आर्थिक मदत दिली. एका आठवड्यात सावली तालुक्यात वाघाच्या हल्यात ठार झाल्याची ही आडवड्यातील तिसरी घटना असल्याने तालुक्यातील शेतकरी आणि नागरीकांना दहशती मध्ये जीवन जगावे लागत आहे. हल्लेखोर वाघांचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी तालुक्यात जोर धरत असतांना पालकमंञी असलेल्या वनमंञ्याच्या जिल्ह्यात वाघाच्या हल्यात मणुष्याचे बळी जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने वनमंञ्याच्या गृहजिल्ह्यात मानव दहशतीमध्ये तर वाघ बिनधास्त जीवन जगत असल्याची चर्चा रंगु लागली आहे.