रेतीचा अवैद्य उपसा करतांना तीन ट्र्ँक्टर ताब्यात घेतले, महसुल विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईने रेती व्यावसायीकांचे धाबे दणाणले

40

मूल : उमा नदीच्या उश्राळा घाटावर संधी साधुन अवैद्यरित्या रेतीचा उपसा करून गैरमार्गाने विकण्याचा प्रयत्न करत असतांना महसुल विभागाच्या पथकाने चार ट्र्ँक्टर ताब्यात घेतल्याने अवैद्य रेती व्यासायीकांचे धाबे दणाणले आहे.

मूल तालुक्यातील मारोडा-पेटगांव मार्गावरील उश्राळा गांवालगत असलेल्या उमानदीच्या घाटावरून मोठया प्रमाणांत रेतीचे उत्खनन होत असल्याची गुप्त माहिती महसुल विभागाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे रेती उपसा करणा-यांवर आळा घालण्यासाठी नायब तहसिलदार नंदकिशोर कुमरे यांचे नेतृत्वात भरारी पथक तयार करण्यांत आले. तयार करण्यांत आलेल्या भरारी पथकातील मंडल अधिकारी संजय कानकाटे, दिपक गोहणे, तलाठी शंकर पिदुरकर आणि महेश पेंदोर यांनी आज पहाटे ४ वाजता पासून उश्राळा रेती घाटालगत पाळत ठेवली. पाळतीवर असतांना चार ट्र्ँक्टर सदर रेती घाटावर रेतीचा उपसा करण्यासाठी आले. दरम्यान ८.४० वा. चे दरम्यान भरारी पथकाने धाड मारत रेतीने भरलेले तीन आणि रेती भरण्याचे उद्देशाने उभा असलेला एक असे चार ट्र्ँक्टर ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या ट्रॅक्टरची अधिक माहिती घेतली असता सदर ट्र्ँक्टर मारोडा येथील सचिन गुरनूले, विकास चौधरी, बाळु मंडलवार आणि श्रीकोंडावार यांच्या मालकीचे असल्याचे समजले. भरारी पथकाने ताब्यात घेतलेले ट्र्ँक्टर तहसिल कार्यालयात आणले असून नियमानुसार कारवाई करण्यांत येत आहे. ताब्यात घेतलेल्या ट्र्ँक्टर पैकी दोन ट्र्ँक्टरवर नंबर प्लेट नसुन बांधकाम पुर्ण करण्यासाठी अनेकांना रेतीची आवश्यकता असल्याची संधी साधुन तालुक्यातील अनेक मंडळी रेतीचा अवैद्य व्यवसायात गुंतले आहेत. हे विशेष

शासनाने रेती घाटांचा नियमानुसार लिलाव केला असता तर बेरोजगार युवक अधिकृत रेतीघाट धारकांकडून शासकिय दरानुसार रेती खरेदी करून गरजवंताना रेती उपलब्ध करून दिले असते. रोजगार म्हणून अनेक युवकांनी रेती व्यवसायाची निवड केली असून बॅंक आणि खाजगी विक्रेत्यांकडून ट्रक आणि ट्र्ँक्टर खरेदी केले आहेत. याचे हप्ते त्यांना नियमित भरावे लागत आहेे. परंतू शासनाने रेती घाटांचा लिलाव न केल्यामूळे असंख्य बेरोजगार युवक अडचणीत सापडले असुन कुटूंबाच्या उदरनिर्वाह आणि कर्जाचे हप्ते भरण्याकरीता नाईलाजास्तव रेतीचा अवैद्य व्यवसाय करीत आहेत. याला शासन जबाबदार आहे.

संतोषसिंह रावत,
अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here