कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल संपन्न

12

मूल : कृषि महाविद्यालय मूल येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, वन प्रशासन विकास संशोधन व व्यवस्थापन प्रभोदिनी चंद्रपूर, श्रद्धेय श्री अटलबिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन विसापूर व विभागीय कृषी संशोधन केंद्र आणि कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाही, कृषि विज्ञान केंद्र व कृषि संशोधन केंद्र, कृषि महाविद्यालय गडचिरोली येथे सहल नुकतीच संपन्न झाली.

बांबू संशोधन केंद्र चिचपल्ली येथे बांबू पासून वस्तू कश्या तयार करतात या बाबतचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखविले. शेतकऱ्यासाठी बांबू लागवडी साठी विविध योजना या बद्दल सखोल माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. श्रद्धेय श्री अटलबिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन विसापूर येथे विज्ञान केंद्र, जैविविधता केंद्र मध्ये विविध तृणधान्य पिकाचे वाण, फुलपाखरू उद्यान, बोन्साय उद्यान, गुलाब उद्यान, विज्ञान प्रदर्शनी, म्युझियम मध्ये विविध खडकाचे प्रकार तसेच झाडांच्या जुन्या प्रजाती, अत्याधुनिक मत्स्यालय मध्ये विविध प्रकारच्या मत्स्य जाती, विविध झाडांचे प्रकल्प पाहण्याची संधी विध्यार्थाना मिळाली. विभागीय कृषि संशोधन केंद्र सिंदेवाही येथे उन्हाळी मूंग पिकाची सविस्तर माहिती विद्यार्थांनी जाणून घेतली. विविध कृषि अवजारे व जैविक खते इत्यादी विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन केले. कृषि विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली येथील कृषि विज्ञान केंद्राला भेट देवुन शेतकरी उपयोगी साहीत्य, नवीन संशोधन पध्दती, फळ रोपवाटीकेची पाहणी, गोधना साठी मुक्त संचार गोठ्याचे नमुने व विविध प्रजातींच्या गायी याची माहिती जाणुन घेतली. फळ झाडांच्या विविध जातींचे रोपे व त्यांच्या कलम करण्याच्या पद्धती विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्या. या संशोधन केंद्रात मल्चिंग व वांगी लाऊन त्याचा होणार्या फायद्याचे संशोधन केले. डॉ. युवराज खोब्रागडे यांनी विदयार्थ्यांना माहीती दिली. संपन्न झालेल्या शैक्षणिक सहलीचे आयोजन कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठता डॉ. विष्णुकांत टेकाळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. प्रा. देवानंद कुसुंबे, प्रा. मोहिनी पुनसे, डॉ.अक्षय इंगोले व डॉ. गितांशू डिंकवार यांनी सहलीसाठी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here