मूल : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षांचा निकाल सोमवारी (ता. 13 मे) जाहीर करण्यात आला. जाहीर झालेल्या निकालामध्ये मूल येथील सेंट अँन्स पब्लिक स्कुलचा १०० टक्के निकाल लागला असुन निकालाची परंपरा कायम राखली आहे. येथील इशान संतोष राचर्लावार या विद्यार्थ्यांने 96.4 टक्के गुण मिळवुन तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. संकेत कोल्हे आणि अवंनी देशमुख यांनी 95.6 टक्के गुण मिळवुन तालुक्यात दुसरा क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. श्रीकांत कुलकर्णी, अर्णव वाकडे, रेहान मवादिया, रिया महादानी, शिवम कुंदावार आणि नैतीक अग्रवाल या विद्यार्थ्यांनी ९० टक्केच्या वर गुण प्राप्त केले आहे. सदर विद्यालयाच्या 20 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती, यामध्ये 90 टक्केच्या वर 9 विद्यार्थी, 80 टक्के च्या वर 7 विद्यार्थी आणि 70 आणि 60 टक्के 2-2 विद्यार्थी उतीर्ण झाले. इशान संतोष राचर्लावार यांने गणित विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त करून तालुक्याचा लौकीक वाढविला आहे.
प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सचिव डाँली वर्गीस यांचेसह शाळेच्या मुख्याध्यापीका सिस्टर आशा सेबॅस्टियन, सिस्टर फ्रिदा जोशी, सिस्टर लिंडा अंटोनी, सारिका चिलबुले, अर्शी सय्यद, होनी प्रसाद यांनी अभिनंदन केले.