योग नृत्य परीवाराचे वतीने खाना खजाना आनंद मेळावा संपन्न

39

मूल : पाक कले मध्यें महिलांना वाव मिळावा आणि नागरीकांना विविध खादय पदार्थ एकाच ठिकाणी आस्वाद घेता यावा, या उद्देशाने योग नृत्य परीवार मूलच्या वतीने आयोजीत खाना खजाना आनंद मेळावा स्थानिक श्री माॅ दुर्गा मंदिराचे प्रांगणात नुकताच संपन्न झाला. मेळाव्यात साई श्रध्दा ग्रृपने प्रथम तर श्री साई ग्रृपने व्दितीय आणि साठवणे ग्रृपने तिसरा क्रमांक प्राप्त केला.,

मेळाव्याचे उदघाटन योग नृत्य परिवार चंद्रपूरच्या संस्थापक सदस्या किशोरी हिरूळकर यांचे हस्ते फित आणि दिप प्रज्वलन करून झाले. यावेळी मेळाव्याचे प्रायोजक महालक्ष्मी ट्रेडींग कंपनीचे संचालक दिपक उर्फ डिंपी गोयल, व्हेरायटी हार्डवेअरचे संचालक प्रविण उधवाणी, योग इंटरप्राईजेसचे संचालक योग गोगरी यांचेसह योग नृत्य परिवार चंद्रपूरचे सदस्य सुरेश घोडके, रंजना मोडक, सरिता दुर्गे, आकाश घोडमारे, जितेंद्र इजगीरवार, अशोक पडगीलवार, संतोष पिंपळकर, चंदा घोडमारे आणि कांचन घोडमारे आदि उपस्थित होते. आयोजीत मेळाव्यात शहरातील वीस हौसी भगिनी आणि बंधुनी विविध पदार्थाचे स्टाॅल लावले होते. शहरातील साडे तीन हजाराचे वर बंधु भगिनींनी २५ रूपये प्रमाणे कुपन खरेदी करून मेळाव्यातील विविध खादय पदार्थाचा आस्वाद घेतला. स्पर्धेत साई श्रध्दा ग्रृपने प्रथम क्रमांकाचे 11 हजार रूपयाचे रोख बक्षीस प्राप्त केले तर श्री साई ग्रृपने 7 हजार रूपयाचा दुसरा क्रमांक पटकाविला. साठवणे ग्रृपने 5 हजार रूपयाचा तृतिय क्रमांक प्राप्त केला. विजेत्या सर्व स्पर्धकांना महालक्ष्मी ट्रेंडींग कंपनीचे संचालक दिपक उर्फ डिंपी गोयल आणि व्हेरायटीचे संचालक प्रविण उधवाणी यांचे हस्ते बक्षीस देण्यांत आले. विजेत्या तीन स्पर्धकांना स्व.हिना गोगरी यांच्या स्मृती प्रित्यर्थ हिरेन गोगरी यांचे वतीने आणि स्व. दर्शना उधवाणी यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रविण उधवाणी यांचे कडून भेट वस्तु देण्यांत आली. तसेच विजेत्या तीन स्पर्धकांशिवाय स्पर्धेत सहभागी झालेल्या सारा ग्रृप, एमएच-34 ग्रृप, थ्री स्टार ग्रृप, गणेश मल्हार ग्रृप, परीऋतु ग्रृप, संदीप बोरकुटे, जय माता दी ग्रृप, भावना मारकवार, फुडी स्टाॅल, वैभव लक्ष्मी ग्रृप, नंणद भावजय ग्रृप, शारदा ग्रृप, महाकाली ग्रृप, शामला ग्रृपने आणि दुर्गेश्वरी ग्रृप या स्पर्धकांना महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनीचे संचालक डिंपी गोयल यांचे वतीने भेट वस्तु देण्यांत आलीे यावेळी क्रांतीज्योती नागरी सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष गुरू गुरनूले उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन संयोजीका शामला बेलसरे यांनी केले, संयोजीका लिना जंबुलवार यांनी प्रास्ताविक तर संयोजीका आरती चेपुरवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी वैशाली बोकारे, वैशाली काळे, उमा महावादिवार, वैेशाली घुगरे, सुनिता नेरल, सविता मारटकर, संगीता पाटील, समता बन्सोड, विद्या नागोसे, मोनीका कवाडकर, दिपाली मोहुर्ले, मिनाक्षी छोनकर, कल्पना मस्के, वर्षा पडोळे, राधीका बुक्कावार आदिंनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here