आईसक्रीम खात असलेल्या युवकाचा ट्रकच्या धडकेत मृत्यु, मूल येथील गांधी चौकातील घटना

50

मूल : स्थानिक गांधी चौकातील आईसक्रीम दुकाना समोर मिञांसोबत आईसक्रीम खात असलेल्या युवकाला भरधाव ट्रकने धडक दिल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल (५ मे) राञी १० वा. सुमारास घडली. प्रज्योत नरेंद्र गेडाम वय 20 वर्षे रा. चोरगाव असे मृत्तक युवकाचे नांव आहे

तालुक्यातील आकापूर येथील देवनिल नर्सींग विद्यालयात नर्सींगचे प्रशिक्षण घेत असलेला प्रज्योत नरेंद्र गेडाम (२०) रा. चोरगांव ता. चंद्रपूर हा विद्यार्थी टेकाडी येथील काकाकडे राहुन आकापुर येथे नर्सिंगचे शिक्षण घेत होता. रविवारी जेवन केल्यानंतर आईस्क्रिम खायची इच्छा झाल्याने प्रज्योत अनिकेत गोंगले (१९) आणि मुस्ताक अल्ली सय्यद (२१)दोघेही रा. टेकाडी या मित्रांसोबत मूल येथे आला, दरम्यान गांधी चौक येथील आईस्क्रीमच्या दुकाना मधुन आईस्क्रिम घेवुन मिञांसोबत खात असताना सिंदेवाही वरून चंद्रपूर कडे जाणारा ट्रक क्रं. एम एच ४० बि जी ८२६८ चे चालक मनोजकुमार व्दारकासींग तिवारी (५५) रा. नागपूर याचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने त्याने दुकाना समोर उभा असलेल्या प्रज्योत नरेंद्र गेडाम याला जबर धडक दिली. घटनेच्या वेळेस ट्रक भरधाव वेगात असल्याने झालेल्या धडकेत प्रज्योत जागीच मृत्यु पावला. इतर जवळपास असलेल्या नागरीकांनी इतरत्र पळापळ केली, जवळच असलेल्या एका ऑटोलाही ट्रकनी धडक दिली, मात्र ऑटोचे नुकसान झालेले नाही. मृत्तकाचे मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करून शव नातेवाहीकांच्या सुपुर्द करण्यात आले.
आरोपी ट्रक चालकाविरूध्द पोलीस स्टेशन मूल येथे कलम 279, 337, 304 (अ) भादवी, मुंबई पोलीस अँक्ट कलम 184 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ठाकरे, पोलीस अंमलदार यशवंत कोसनशिले रफीक शेख करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here