मूल येथील दुर्गा मंदीरात होणार खाना खजाना आनंद मेळावा

20

मूल : महिलांच्या पाक कलेला वाव मिळावा आणि नागरीकांना विविध पदार्थ एकाच ठिकाणी खायला मिळावे, या उद्देशाने योग नृत्य परीवार मूलच्या वतीने रविवार दिनांक 5 मे 2024 रोजी स्थानिक श्री माॅ दुर्गा मंदिराचे प्रांगणात खाना खजाना आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यांत आले आहे. आयोजीत मेळाव्यात शहरातील हौसी भगिनी आणि बंधु विविध पदार्थाचे स्टाॅल लावणार आहेत. 25 रूपये प्रति कुपन प्रमाणे हौसी नागरीकांना मेळाव्यात सहभागी झालेल्या कोणत्याही स्टाॅल वर जावून कोणतेही एक पदार्थ खायला मिळणार आहे. अश्या प्रकारे ज्या स्टाॅलवर सर्वाधिक कुपन गोळा होतील. त्या नुसार विजेत्या तीन स्पर्धकांना आयोजक योग नृत्य परीवार मूलच्या वतीने अनुक्रमे 11 हजार, 7 हजार आणि 5 हजार रूपयाचे बक्षीस दिल्या जाणार आहे. याशिवाय विजेत्या तीन स्पर्धकांना स्व.हिना गोगरी यांच्या स्मृती प्रित्यर्थ हिरेन गोगरी यांचे वतीने आणि स्व. दर्शना उधवाणी यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रविण उधवाणी यांचे कडून भेट वस्तु देण्यांत येणार आहे. तसेच विजेत्या तीन स्पर्धकांशिवाय स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनीचे संचालक डिंपी गोयल यांचे वतीने भेट वस्तु देण्यांत येणार आहे. आयोजीत स्पर्धेचे उद्घाटन रविवार दिनांक 5 मे 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजता होणार असून बक्षीस वितरण रात्रो 10 वाजता होणार आहे. आयोजीत खाना खजाना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणि विविध पदार्थ खाण्यासाठी प्रती कुुपन 25 रूपये प्रमाणे खरेदी करून येण्याचे आवाहन स्पर्धेच्या संयोजीका आरती चेपुरवार, वैशाली बोकारे, शामला बेलसरे, वैशाली काळे, उमा महावादिवार, लिना जंबुलवार, वैशाली घुगरे, सुनिता नेरल, सविता मारटकर, संगीता पाटील, समता बन्सोड, विद्या नागोसे, मोनीका कवाडकर, दिपाली मोहुर्ले, मिनाक्षी छोनकर, कल्पना मस्के, वर्षा पडोळे, राधीका बुक्कावार आदिंनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here