मूल : सिदेंवाही येथुन दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी कडे महेंद्र पीकअप वाहणाने गैरमार्गाने देशी दारू नेत असतांना चंद्रपूर येथील स्थानिय गुन्हे शाखेच्या पथकाने खेडी गोंडपिपरी मार्गावरील भवराळा लगत ताब्यात घेतली.
मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे चंद्रपूर येथील स्थानिय गुन्हे शाखेचे सपोनि हर्षल एकरे सहकारी पो.हवा. किशोर वैरागडे, रजनीकांत पुट्टावार आणि सतिश अवथडे खेडी गोंडपिपरी मार्गावरील भवराळा लगत नाकेबंदी करून वाहणांची तपासणी करीत असतांना महेंद्र पिकअप क्र. MH-35-K-4159 मध्ये ३० पेट्या देशी दारू आढळुन आली. पोलीस पथकाने लागलीच पंचसमक्ष चौकशी करून वाहणासह वाहण चालक आदील दाऊद खाँ पठाण (२७) रा. दसरा चौक सिंदेवाही आणि सहकारी निलेश बांबोळे (२६) रा. राम मंदीर जवळ सिंदेवाही यांना ताब्यात घेतले. पकडण्यात आलेल्या दारूची किंम्मत १ लाख ५ हजार असुन वाहणाची किंम्मत ७ लाख असा एकुण ८ लाख ५ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या वाहणात देशी दारू भरून वाहतुक करण्यास भाग पाडणारा मुख्य आरोपी सागर बोम्मावार सध्या फरार असुन पोलीस त्याचा शोध घेत आहे. अटकेत असलेले दोन्ही आरोपी सध्या पोलीस स्टेशन मूल येथील बंदीगृहात आहेत. मूल स्टेशनच्या हद्दीमधुन लाखोची दारू वाहतुक होत असतांना मूल पोलीसांना माहीती न होता चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेला माहीती होवुन ती पकडण्यात यावी. यविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.