कोतवाल असलेल्या सरपंचाच्या मुलाचा मनमानी कारभार, दोन महीने होवुनही ग्राम पंचायतीची बघ्याची भुमीका

21

मूल : वडील सरपंच असल्याचा गैरफायदा घेत कोतवाल असलेल्या मूलाने रस्त्यावर माती टाकून पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद केल्याने पाणी साचुन राहत आहे. त्यामूळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून याबाबत तक्रार करूनही ग्राम पंचायत प्रशासन मात्र बघ्याची भूमीका घेत असल्याचा आरोप अरविंद केळझरकर आणि ज्ञानेश्वर लेनगुरे यांनी केला आहे.

तालुक्यातील चिमढा येथील वार्ड नं. २ मध्ये आरोपकर्ते वास्तव्याने असून त्यांच्या मालमत्तेची ग्राम पंचायत मध्यें नोद आहे. आरोपकर्त्यांच्या घरालगतच सरपंच कालीदास खोब्रागडे यांचे घर असून त्यांना मुख्य मार्गाकडे ये-जा करण्यास मार्ग आहे. असे असतांना सरपंच याचा मुलगा सुशांत कालीदास खोब्रागडे अरविंद केळझरकर यांच्या वापरात असलेल्या जागेमधून बळजबरीने रस्ता काढण्याचा प्रयत्न करीत आहे. असे करतांना सुशांत खोब्रागडे यांनी वडील सरपंच आहेत. कोण काय करते ते पाहून घेवू म्हणत केळझरकर आणि लेनगुरे यांचे घरासमोरून गेलेल्या रस्त्यावर बळजबरीने ट्रॅक्टरने माती टाकली. ऐन मार्गावर खोब्रागडे यांनी पदाचा गैरवापर करून माती टाकल्याने परिसरातील नागरीकांना ये जा करणे अडचणीचे जात असून अवकाळी येत असलेल्या पावसाचे पाणी साचून केळझरकर आणि लेनगुरे यांचे घरात शिरत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात नागरीकांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांना सदरची बाब तोंडी व लेखी स्वरूपात निदर्शनास आणून दिली. परंतू दोन महिणे होवूनही ग्राम पंचायत प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. नागरीकांच्या समस्येकडे ग्राम पंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरीकांनी सदर प्रकाराची संवर्ग विकास अधिकारी आणि तहसिलदार यांचेकडे तक्रार नोंदविली आहे.
रस्त्यावर माती टाकून नागरीकांना नाहक त्रास देणारा सुशांत खोब्रागडे हा सरपंच कालीदास खोब्रागडे यांचा मुलगा असुन चिचाळा येथे कोतवाल पदावर सेवारत आहे. त्यामूळे सर्व कायदे आपल्या हातात आहे असे सांगत ग्रामस्थांशी मुजोरीने वागत नेहमी मारण्याची भिती दाखवत असतो. अश्या आशयाची तक्रार नागरीकांनी पोलीस स्टेशन येथेही दाखल केली. परंतू पोलीस प्रशासनाकडूनही सुशांत खोब्रागडे यांना संरक्षण दिल्या जात असल्याने सदर प्रकरणात राजकारण आड येत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे.

सुशांत खोब्रागडे यांनी स्वखर्चाने रस्त्यावर माती टाकली असून त्यामूळे कोणाला काय त्रास होत आहे. ते ग्राम पंचायत प्रशासन बघेल. आपल्याकडे पुन्हा एका ग्राम पंचायतीचा प्रभार असल्याने नागरीकांच्या तक्रारीकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही.
श्रीमती कुंभमवार, ग्राम सेवक चिमढा

सुशांत खोब्रागडे यांचे संदर्भातील तक्रार अद्याप आपल्या पर्यत पोहोचली नाही. तक्रार प्राप्त होताच नियमानुसार कार्यवाही करण्यांत येईल.

मृदुला मोरे, तहसिलदार मूल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here