मूल शहरात पार पडला श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा

37

मूल : मातोश्री स्व.कमलादेवी रावत यांचे स्मृती प्रित्यर्थ रावत परीवाराचे वतीने निर्माण करण्यात आलेल्या स्थानिक बस स्थानक परीसरातील श्री हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळी ६.३० वा. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा जि.प. माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत आणि रूपलसिंह रावत यांनी पुजा अर्चना व अभिषेक केला. सकाळी ८ वाजता भजन आणि गोपाल काला पार पडल्या नंतर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी हजारो नागरीकांनी हनुमानजी दर्शनासोबतच महाप्रसादाचा आस्वाद घेतला. कार्यक्रम पार पाडण्यासाठी लोमेश नागापुरे, सुनिल मंगर, संजय टिकले, राजु गावतुरे, प्रतीक मुरकुटे, गुरु गुरनुले, चतुर मोहुर्ले, केशव गुज्जनवार, किशोर गुज्जनवार, छोटू रावत, सुमितसिंह बिष्ट, तेजस महाडोळे, निखिल पांडव आदींनी परीश्रम घेतले.

श्री साई मिञ परीवार मूल व्दारा निर्मित रेल्वे स्टेशन लगतच्या जुना सोमनाथ येथील श्री हनुमान मंदीरातही हनुमान जयंतीचा सोहळा धार्मिक विधीनुसार पार पडला. संध्याकाळी आयोजित महाभोजनास हजारो भाविकांनी लाभ घेतला. याठिकाणी कार्यक्रम पार पाडण्यासाठी विवेक मुत्यलवार, बंडु साखलवार, महेश गाजुलवार, संदीप मोहबे, नाना किर्तीवार, संदीप मोहबे, अभिजीत चेपुरवार आदी सहका-यांनी परीश्रम घेतले.
संध्याकाळी श्री हनुमान जयंती उत्साही मिञ मंडळाच्या वतीने संदीप आगडे, हेमंत कोमलवार आणि रिंकु मांदाडे यांचे नेतृत्वात हनुमान जन्मोत्सव निमित्य शहरात भव्य मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीतील महाकाल, राम लक्ष्मण आणि सिता आणि विर हनुमानाचे धार्मिक चल देखावे नागरीकांसाठी आकर्षण ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here