लोकसभा निवडणुकीसाठी बल्लारपुर विधानसभा मतदार संघात प्रशासन सज्ज

45
  1. मूल : चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील बल्लारपूर, पोंभूर्णा आणि मूल तालुक्यातील एकुण 361 मतदान केंद्रावर 1444 मतदान अधिकारी आणि कर्मचारी सुखरूप पोहोचले असून प्रशासन सज्ज झाले आहे.

जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांचे नेतृत्वात उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणुक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. मूल, पोंभूर्णा आणि बल्लारपूर येथील तहसिलदार यांचेसह स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी सहायक म्हणून सहकार्य करीत असल्याने मतदानाची प्रक्रिया अडचणीविना शांततेत पार पडणार आहे. 19 एप्रिल रोजी मतदान होणार असल्याने मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी आज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयामधून 1444 अधिकारी आणि कर्मचारी वेगवेगळया वाहणांने मतदार संघातील 361 मतदान केंद्रावर पोहोचले असून राखीव असलेले 144 कर्मचा-यांचे 36 मतदान पथक मतदानाची प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत. 750 पोलीस व होमगार्ड कर्मचारी सुध्दा शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सज्ज झाले आहेत. 42 झोनल अधिकारी ३६१ मतदान केंद्रावर लक्ष ठेवणार आहेत. होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा मतदार संघात 3 लाख 1 हजार 242 मतदारांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या एकुण मतदारांपैकी केवळ 242 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. नव मतदार असलेल्या 4326 युवा मतदारांपैकी किती मतदार लोकशाहीच्या उत्सवात मतदानाचा अधिकार पहिल्यांदा पार पाडतात. हे ही तेवढेच महत्वाचे राहणार आहे.

मतदार यादीमधील जास्तीत जास्त मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून शासनाच्या वतीने नियुक्त केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांच्या मार्फतीने मतदार चिट्टी पोहोचविण्याचे काम हाती घेण्यांत आले. त्यामूळे अनेक मतदारांना मतदार चिट्टया मिळाल्या असल्या तरी काही मतदार आजही चिट्टीपासून वंचित आहेत. काही राजकिय पक्षांनी आँनलाईन चिठ्या पोहोचविण्याची पध्दत अवलंबल्याने शासनाच्या चिट्टीपासून वंचित असलेल्या मतदारांना पक्षाच्या वतीने चिट्टया प्राप्त झाल्या. अन्यथा मतदानाची टक्केवारी मोठया प्रमाणांत कमी झाली असती. अशी चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here