पडद्याआड असलेल्या काँग्रेस नेत्यांच्या भुमीकेमूळे काँग्रेसजण संभ्रमात, नेत्यांच्या मनधरणीचे ताईसमोर आव्हाण, आज चंद्रपूर येथे नेत्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन

49

मूल : दिवंगत खासदार बाळु धानोरकर यांच्या मृत्यु विषयी जनतेला माहिती असतांना पतीच्या मृत्युस जिल्हयातील काॅंग्रेस नेते कारणीभुत असल्याचे केलेले विधान जिल्हयातील काॅंग्रेसच्या काही नेत्यांच्या जिव्हारी लागल्याची चर्चा असून होवू घातलेल्या अटीतटीच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पडदयाआड राहण्याने काॅंग्रेसजन संभ्रमात पडल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर होण्याच्या काही दिवसांपूर्वी काॅंग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी पती दिवंगत खा. बाळु धानोरकर यांच्या मृत्युविषयी विधान करतांना जिल्हयातील काॅंग्रेसच्या काही नेत्यांना आरोपीच्या पिंज-यात उभे केले. प्रतिभाताईचे सदर विधान सत्य कि असत्य हे कोणालाही सांगता येणारे नसले तरी चर्चेला उधाण आणणारे ठरले. सदर विधानामूळे धानोरकर समर्थकांनी ताईंची वाहवाहकी केली तर अनेकांनी निवडणुकीच्या तोंडावर केलेले विधान ताईंना भोवणारे ठरणार. असे मत नोंदवत नाराजी व्यक्त केली. शेवटी हेच झाले, भावनेच्या भरात केलेले तेे विधान आज ताईंना जड जात असून उमेदवारी अर्ज दाखल करून आज आठवडा होत आहे. निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत असतांनाही स्व. बाळुभाऊच्या निवडणुकीत जीवाचे रान करीत फिरणारे काॅंग्रेसचे अनेक नेेते ताईंचे जिव्हारी लागलेले विधान पचवत भूमीगत असल्याचे दिसून येत आहे. असेच चित्र मतदानाच्या दिवशीपर्यंत कायम राहावे, अशी भाजपा नेत्यांची अपेक्षा आहे. भाजपा नेत्यांची असलेली ही अपेक्षा फोल ठरविणे ताईंसमोर आव्हाण ठरले आहे. भूमीगत असलेल्या काॅंग्रेस नेत्यांना निवडणुक प्रचारार्थ सहकार्य करण्यासाठी करण्यांत येत असलेल्या प्रयत्नात ताई कितपत यशस्वी होतात. याकडे काॅंग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या सेवेसाठी झटणारी बॅंक म्हणून ओडखल्या जाणारी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अनेक संचालक प्रतिभाताई आणि सुधीरभाऊ वर नाराज आहेत. बॅंकेवर काॅंग्रेसचे वर्चस्व असल्याने बॅंकेच्या कार्यप्रणाली विरूध्द घेतलेली सुधीरभाऊची भूमीका एकदाची राजकारण समजून मान्य करता येईल. परंतू काॅंग्रेसच्याच लोकप्रतिनिधी असलेल्या प्रतिभाताईंकडून काॅंग्रेसच्या वर्चस्वात असलेल्या बॅंकेच्या संचालक मंडळाविरूध्द घेतलेली भूमीका संचालकवृंदा शिवाय खातेदार आणि नोकरीच्या अपेक्षेत असलेल्या बेरोजगार युवकांना आजही मान्य नसल्याचे बोलल्या जात आहे. वास्तविक काॅंग्रेसजनांच्या सहकार्याने लोकप्रतिनिधी म्हणून निर्वाचित झालेल्या धानोरकर दाम्त्पत्यांनी बॅंकेच्या संचालक वृंदाशी जुळवून घेणे पक्षासोबतचं त्यांच्या, शेतकरी, खातेदार आणि बॅंकेच्या हिताचे होते. परंतू असे न करता त्यांनी सुधीरभाऊंच्या पावलावर पाऊल टाकत बॅंक विरूध्द भूमीका स्विकारली. जिल्हयातील शेकडो सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरीच्या रूपाने रोजगार मिळावा म्हणून बॅंकेत रिक्त असलेले 361 पद भरण्याची शासनाने परवानगी दिली, परंतू सुधीरभाऊ आणि धानोरकर दाम्प्त्यांनी प्रखर विरोध केल्याने मंजूरी मिळालेली नोकर भरती आजही रखडून आहे. जिल्हयातील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या शेतक-यांना शेतकरी कल्याण निधी मधून बॅंक 40 हजाराची सानुग्रह मदत देत होती. त्यामूळे जिल्हयातील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या शेतक-यांना उपचारा करीता अल्पशी कां होईना मदत होत होती. परंतू मदतीच्या याही योजनेत ताई आणि भाऊंनी खोडा आणला. त्यामूळे दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले अनेक शेतकरी बँकेच्या योजनेच्या लाभापासून आजही वंचित आहेत. एकंदरीत नोकर भरतीवर निर्बंध आणुन सुशिक्षीत बेरोजगारांवर आणि शेतकरी कल्याण निधी योजनेत खोडा आणुन गरजवंतावर अन्याय केल्याने सध्यास्थितीत बेरोजगार युवक, शेतकरी, बॅंकेतील कर्मचारी आणि काही संचालक प्रतिभाताई आणि सुधीरभाऊ वर नाराज असल्याचे बोलल्या जात आहे. 19 एप्रिलच्या घोडा मैदानात बाजी जिंकण्यासाठी ताई आणि भाऊ नाराज असलेल्या घटकांची नाराजी कोणत्या मार्गाने दूर करतात. याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here