मूल : स्थानिक मेडीकल प्रँक्टीशनर असोसिएशनचे पदाधिकारी तथा सुपरीचित वैद्यकीय अधिकारी डाँ. विनोद चौधरी यांच्या मातोश्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. सुनिता चौधरी यांच्या सासु आई श्रीमती कमलबाई हरीभाऊ चौधरी (८५) यांचे आज दुपारी १.३० वा. मूल येथील डाँ. विनोद चौधरी यांचे निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे पश्चात मुल डाँ. विनोद, दिलीप, अशोक आणि मुलगी शालीनी दडमल यांचे सह, स्नुषा आणि नातवंड असा मोठा परीवार आहे. उद्या शुक्रवार दि. ५/४/२०२४ रोजी सकाळी ११ वा.,स्व. कमलबाई चौधरी याची अंत्ययाञा डाँ. विनोद चौधरी यांचे निवास स्थान येथुन निघणार आहे. आप्तस्वकीयांनी नोंद घ्यावी. मूल टुडे तर्फे स्व. कमलबाई चौधरी यांना भावपुर्ण श्रध्दांजली.