२०१९ मध्ये झालेली मतांची तुट भाजपा २०२४ मध्ये भरून काढणार काय ? काँग्रेसच्या उमेदवार निश्चितीनंतर राजकीय वातावरण तापणार

55

मूल : चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातंर्गत येत असलेल्या बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील मूल तालुका 2019 मध्यें झालेल्या लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेस पक्षाच्या पाठीशी राहीला. होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र राज्याच्या विधानसभेत तालुक्याचे नेतृत्व करणारे सुधीर मुनगंटीवार स्वतः भाजपा युतीचे उमेदवार म्हणून रिंगणात असल्याने होवू घातलेल्या निवडणुकीत मूल तालुका कोणाला अधिक कौल देते. हे निवडणुक निकालाअंती पहायला मिळणार आहे.

एकेकाळी काॅंग्रेसचा बालेकिल्ला असलेला मूल तालुका मागील पंचेवीस ते तीस वर्षापासून भाजपाचा गड झाला आहे. शोभाताई फडणवीस यांचे नंतर सुधीर मुनगंटीवार प्रतिनिधीत्व करीत असलेल्या बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील मूल तालुक्यात भाजपा वरचढ आहे. असे असले तरी 2019 मध्यें झालेली लोकसभा आणि दिड वर्षापूर्वी झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत “हम भी कम नही” म्हणत काॅंग्रेसने भाजपावर मात केली. 2019 मध्यें झालेल्या लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील 58 गांवातील 104 मतदान केंद्रावर झालेल्या मतदानात काॅंग्रेसचे बाळु धानोरकर यांनी भाजपाच्या हंसराज अहीर यांचेपेक्षा 2821 मतांची आघाडी घेतली होती. शहराच्या नगर परिषदेत भाजपाची सत्ता असतांना मूल शहरात काॅंग्रेसने 367 मत अधिक घेतले. तालुक्यातील बेंबाळ, गडीसुर्ला, डोंगरगांव, टेकाडी, चिचाळा, सुशी या मोठया लोकसंख्येच्या गावांत भाजपाने तर राजोली, चिखली, मारोडा, राजगड, चांदापूर, जुनासूर्ला, भेजगांव, नवेगांव भुजला आदि गावांत काॅंग्रेसने सरशी घेतली होती. केळझर, चिरोली, खालवसपेठ, फिस्कुटी, कांतापेठ, विरई, चिमढा, टेकाडी याठिकाणी वंचितचे राजेंद्र महाडोळे यांनी मतांची आघाडी घेतली होती. तालुक्यातील 623 मतदारांनी रिंगणात असलेले एकही उमेदवार मान्य नाही म्हणत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नोटावर मतदान केले होते. मतांच्या आकडेवारीवर नजर फिरवल्यास 2019 मध्यें झालेल्या लोकसभा निवडणुकीत मूल तालुक्यात भाजपा पेक्षा काॅग्रेसने 2821 मत अधिक घेवून दिवंगत बाळु धानोरकर यांच्या विजयाचा मूल तालुका वाटेकरी झाला होता. होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र तालुक्याचे प्रतिनिधीत्व करीत असलेले सुधीर मुनगंटीवार भाजपाकडून रिंगणात असल्याने 2019 ची पुनरावृत्ती होवु नये, म्हणून भाजपा कार्यकर्ते उमेदवारी जाहीर झाल्यापासून युध्दपातळीवर कामाला लागले आहे. प्रचाराची पहीला पायरी चढली असुन संपर्क अभियान जोरदार सुरू आहे. दुसरीकडे माञ 2019 च्या लोकसभा निवडणुकी नंतर तालुक्यातील काॅंग्रेस गोटात मोठया प्रमाणांत पाणी वाहुन गेले असून गटबाजी उफाळून आली आहे. भाजपाचे वर्चस्व असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत सहका-यांच्या सहकार्याने तालुक्यात काँग्रेसचा दबदबा कायम ठेवत आहेत. दुसरीकडे माञ बाजार समिती असो की ग्राम पंचायत असो त्या निवडणुकीत भोपळाही फोडु न शकणारी काही मंडळी नेतेगिरीचा आव आणत गटबाजी आसल्याचे दाखवत आहेत. त्यामूळे काॅंग्रेस युतीच्या उमेदवारांसमोर मूल तालुका आव्हाण ठरणार असून गठबाजीत विखुरलेल्या तालुक्यातील काॅंग्रेसविरांना एका छताखाली बसविण्याचे आव्हाणा राहणार आहे. सुधीरभाऊ आगे बढो म्हणत भाजपाची टिम तालुक्यात प्रचारार्थ सक्रीर्य झाली असतांना दुसरीकडे माञ तालुक्यातील काँग्रेसवीर उमेदवार कोण ? म्हणत बघ्याच्या भुमीकेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here