मूल : 19 एप्रिल रोजी होवू घातलेल्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचार संहितेच्या पालना सोबतचं बल्लारपूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रात करण्यांत आलेल्या प्रशासकिय कार्यवाहीची माहिती उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणुक अधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी दिली. स्थानिक प्रशासकिय भवनात आयोजीत पत्रकार परिषदेत निवडणुक पूर्व करण्यांत आलेल्या तयारीची माहिती देतांना उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी चंद्रपूर लोकसभा मतदार संघातंर्गत येत असलेल्या बल्लारपूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील मूल, पोंभूर्णा आणि बल्लारपूर तालुक्यात 357 मतदान केंद्र निर्माण करण्यांत आले असून 4 नवीन मतदान केंद्राचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगीतले. होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत 1 लाख 53 हजार 956 पुरूष, 1 लाख 47 हजार 29 महिला आणि तृतिय पंथी 3 असे एकुण 3 लाख 978 मतदार नोंद असल्याचे सांगतांना सहाय्यक निवडणुक अधिकारी विशाल मेश्राम यांनी 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेले 2246 आणि 1842 चाळीस टक्के अपंगत्व असलेले मतदार आहेत. 4224 नव मतदार असून हे मतदार यावेळेस प्रथमचं लोकशाहीच्या उत्सवात मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे सांगीतले. निर्माण करण्यांत आलेल्या 361 मतदान केंद्रावर प्रत्येकी चार याप्रमाणे 1587 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी निवडणुक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगतांना विशालकुमार मेश्राम यांनी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, यादृष्टीने प्रशासकिय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असणार असल्याचे सांगीतले. यावेळी मूलच्या तहसिलदार मृदुला मोरे, पोंभूर्णाचे तहसिलदार शिवाजी कदम, मुख्याधिकारी तथा नायब तहसिलदार यशवंत पवार, नोडल अधिकारी निलेश चव्हाण आदि उपस्थित होते.
Home Breaking News लोकसभा निवडणुकीसाठी है तयार हम, सहाय्यक निवडणुक आधिकारी विशालकुमार मेश्राम यांची ग्वाही