शिवाजी भगत मूलचे नवे पोलीस उपविभागीय अधिकारी

37

मूल : सेवानिवृत्तीमूळे रिक्त झालेल्या येथील उपविभगाीय पोलीस अधिकारी पदावर शिवाजी भगत याची नियुक्ती झाली असून येत्या आठवडयाभरात नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी भगत पदभार सांभाळणार आहेत.

येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर दिड महिण्यापूर्वी साहील झरकर यांची नियुक्ती झाली होती. नियुक्तीनंतर साहील झरकर आठवडयाभरात पदभार सांभाळणार होते. परंतू झरकर यांच्या नियुक्तीमध्यें राजकारण आड आल्याने मूल येथे नियुक्त झालेले साहील झरकर यांना गोंदिया जिल्हयातील तिरोडा पोलीस उपविभागाचा पदभार सांभाळावा लागला. मल्लीकार्जुन इंगळे हे नियत वयमाने सेवानिवृत्त झाल्याने येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पद रिक्त आहे. पोलीस उपविभागातंर्गत मूल, गोंडपिपरी, पोंभूर्णा, उमरी पोतदार आणि पाथरी पोलीस स्टेशन समाविष्ट असल्याने येथील कामाचा भार अधिक आहे. शिवाय तोंडावर आलेली लोकसभा निवडणुक लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातुन येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर नियुक्ती करणे अनिवार्य असल्याने अमरावती ग्रामीण पोलीस विभागामधून शिवाजी भगत यांचे मूल येथे स्थानांतरण करण्यांत आले आहे. सलग एकतीस वर्षे पोलीस दलात सेवारत असलेले पोलीस उपविभागीय अधिकारी शिवाजी भगत सध्या अंजनगांव सुर्जी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर सेवारत असून त्यांचेकडे अचलपूर आणि धारणी उपविभागाचा पदभार असल्याने मूल येथे रूजू होण्यास विलंब होत असल्याचे समजते. उत्तम आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणुन परीचीत असलेले शिवाजी भगत यांचे समोर मूल उपविभागातंर्गत सुरू असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्याचे आव्हान राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here