*संकुचित विचारांमध्ये अडकुन न राहता ध्येय डोळ्यासमोर ठेवुन कार्य करा – ममता रावत* *महीला काँग्रेसच्या वतीने पार पडला कर्तृत्ववान व कष्टकरी तीस महीलांचा सत्कार

44

मूल : आजची महिला चुल आणि मुल पुरता मर्यादीत राहीली नसून जगातील सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी मारत हम किसीसे कम नही हे सिध्द करून दाखविले आहे. त्यामूळे महिलांनी जुन्या संकुचित विचारामध्यें अडकुन न राहता नवे ध्येय व स्वप्न डोळयासमोर ठेवून कुटूंबासोबतचं विविध क्षेत्रात भरारी मारावी. असे आवाहन माॅ दुुर्गा महिला मंडळाच्या अध्यक्षा ममता संतोषसिंह रावत यांनी केले.

मूल तालुका व शहर महिला काॅंग्रेस पार्टीच्या वतीने आयोजीत कर्तृत्ववान व कष्टकरी महिलांच्या सत्कार सोहळयात ममता रावत बोलत होत्या. स्थानिक दुर्गा भवन येथे पार पडलेल्या सत्कार सोहळयाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा महिला काॅंग्रेसच्या अध्यक्षा नम्रता ठेमस्कर होत्या. यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य मिरा शेंडे, शिक्षीका तेजस्वीनी नागोसे, पोलीस निरीक्षक संजीवनी परतेकी, दंत चिकित्सक डाॅ. सायली बोकारे आणि पर्यावरण व मानवता विकास संस्थेच्या विभागीय अध्यक्षा रत्ना चौधरी उपस्थित होत्या. माॅ जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन आणि दिप प्रज्वलन करून ममता रावत यांचे हस्ते सोहळयाचा शुभारंभ झाला. तालुक्यातील नवेगांव भुजला येथील विद्या बुडे यांनी स्वागत गीत सादर केले. यावेळी सत्कारमूर्ती तेजस्विनी नागोसे, प्राचार्य मिरा शेंडे, डाॅ. सायली बोकारे, पो.नि. संजीवनी परतेकी यांनी मनोगत व्यक्त करतांना महीला सक्षमीकरणासोबतच महिलांनी कुटूंबासोबतचं स्वतःच्या व्यक्तीमत्वाचाही विकास करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमा दरम्यान कर्तृत्ववान महिला म्हणून डाॅ. सायली बोकारे, पोलीस निरीक्षक संजीवनी परतेकी, पर्यावरप्रेमी रत्ना चौधरी, शिक्षिका तेजस्विनी नागोसे, यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यांत आला तर हलाखीच्या परिस्थितीत मोलमजुरी करून कुटूंबाच्या उदरनिर्वाह भागविणा-या शहरातील तीस कष्टकरी महिलांचा मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यांत आला. महिला काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर यांनी महीलांचे हक्क अधिकारावर भाष्य करतांना वर्तमान परिस्थितीत केंद्र शासन महागाई वाढविण्यासोबतचं अन्य मार्गाने महिलांवर अन्याय करीत असून स्वस्त धान्य दुकानामधून हलक्या फुलक्या, फाटक्या साडयांचे वाटप करून महिलांची थट्टा करीत असल्याने येत्या काळात महिलांनी काॅंग्रेस सोबत राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर अध्यक्ष नलीनी आडपवार यांनी केले तालुकाध्यक्ष रूपाली संतोषवार यांनी तालुक्यातील महिलांच्या संघटनेवर मनोगत व्यक्त केले. तालुका संघटक टिना ठाकरे यांनी सत्कारमूर्ती महिलांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे संचलन महिला काॅंग्रेसच्या शहर सचिव शामलता बेलसरे यांनी तर उपस्थितांचे आभार समता बंसोड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी नगरसेवीका लिना फुलझेले, राधीका बुक्कावार, सिमा भसारकर, मैथीली अवझे, नाजुका लाटकर, मोनाली कावडकर आदिनी परिश्रम घेतले. तालुक्यातील महीला मोठया संख्येनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा समारोप महीलांच्या विविध स्पर्धेच्या बक्षिस वितरणाने झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here