शरबत वितरणाने महिला दिन साजरा, माजी सैनिक व भरारी महीला संघटनांचा पुढाकार

15

मूल : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्थानिक माजी सैनिक संघटना आणि भरारी माजी सैनिक महिला बचत गटाच्या वतीने पंचायत समिती समोरील बस थांब्यावर नागरीकांसाठी थंड शरबत वितरण करण्यांत आले. विशेष म्हणजे महाशिवरात्री निमित्य मार्कंडा देवस्थान येथे चंद्रपूर वरून मूल मार्गे भाविक मोठया प्रमाणांत जात असतात. ऐन रहदारीच्या मुख्य मार्गावर माजी सैनिक व भरारी महिला मंडळाच्या सदस्यांनी शरबत व थंड पाणी वितरणाचा कार्यक्रम हाती घेतल्याने सामान्य नागरीकांसोबतचं मार्कंडा देवस्थान येथे जाणा-या भाविकांनी शरबताचा लाभ घेतला. जागतिक महिला दिन आणि महाशिवरात्रीचे औचित्य साधून हाती घेतलेला शरबत वितरण उपक्रमाचा श्रीगणेशा माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर यांचे हस्ते झाला. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी भरारी माजी सैनिक महिला बचत गटाच्या अध्यक्षा अंजली सुर, उपाध्यक्ष पुष्पलता जंबुलवार, सचिव कविता मोहुर्ले, सदस्य पंचशीला खोब्रागडे, सुनिता खोब्रागडे, करूणा खोब्रागडे, उज्वला रंगारी, वंदना निकुरे, माजी सैनिक संघटनेचे बाबा सुर आणि लक्ष्मण निकुरे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here