औद्योगिक वसाहतीमधील क्रिष्णा फेरो मध्ये अपघात, चार कामगार जखमी

46

मूल : नागपूर मार्गावरील मरेगांव लगतच्या औद्योगीक विकास वसाहतीमध्यें असलेल्या जी. आर. क्रिष्णा फेरो अँण्ड एलाॅय कंपनी मध्यें मागील आठवडयापासून अपघातांची मालीका सुरू असल्याने कामगार भयभित झाले आहे. असे असतांना कंपनी प्रशासन मात्र बघ्याची भूमीका घेत असल्याने घडलेल्या अपघातांची चौकशी करण्यांत यावी. अशी मागणी मूल शहर युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार यांनी केली आहे. कंपनीमध्यें कामावर असलेल्या कामगारांपैकी राकेश कडस्कर (चिखली) किशोर लाडवे (मरेगांव) आणि निखील नेवारे (करवन) हे तीन कामगार काम करीत असतांना पाईप फुटून वाफ अंगावर आल्याने झालेल्या अपघातामध्यें भाजून जखमी झाले. त्यांना तातडीने उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यांत आले. घडलेल्या सदर घटनेमूळे कामगार भितीग्रस्त वातावरणात काम करत असतांना 19 फेब्रुवारी रोजी पुन्हा गंभीर अपघात घडला. चंद्रपूर येथील कामगार कंपनीमध्यें पेंट मारण्याचे काम करतांना पट्टया मध्यें हात गेल्याने गंभीर जखमी झाला. घडलेले दोन्ही अपघात कंपनी व्यवस्थापनाच्या चुकीच्या पध्दतीमूळे झाले असतांना कंपनी व्यवस्थापन अपघातग्रस्त कामगारांवर दबाव आणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. ही बाब गंभीर असून मनमानी कारभाराचे द्योतक आहे. त्यामूळे घडलेल्या दोन्ही अपघातांची चौकशी करण्यांत येवून जखमी कामगारांना योग्य मोबदला मिळवून दयावा व मनमानी कारभार करणा-या कंपनी व्यवस्थापनाविरूध्द कारवाई करावी. अशी मागणी मूल शहर युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार यांनी तहसिलदार यांना भेटून निवेदनाद्वारे केली. यावेळी युवक काॅंग्रेसचे यश संगमवार, पंकज शेंडे, निकेश सुखदेवे, आकाश शेंडे आणि विजय टिंगुसले उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here