पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण, मूल नगरीत ३ डिसेंबरला साहित्यिकांची मांदियाळी

40

मूल : साहित्यिकांना प्रेरणा देत नवसाहित्याची निर्मिती व्हावी म्हणून प्रसिद्ध झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर व झाडीबोली साहित्य मंडळ शाखा मूल यांच्या विद्यमाने ३ डिसेंबर२०२३ ला बालविकास प्राथमिक शाळा मूल येथे पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलन आयोजित केलेले आहे . या संमेलनाच्या बोधचिन्हाचे संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे व स्वागताध्यक्ष प्रा. रत्नमालाताई भोयर यांचे हस्ते योग भवन मूल येथे करण्यात आले .

यावेळी झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूरचे सचिव लक्ष्मण खोब्रागडे, झाडीबोली साहित्य मंडळ मूल शाखेचे अध्यक्ष ग्रामगीताचार्य सुखदेव चौथाले, सचिव वृंदा पगडपल्लीवार उपस्थित होत्या. सदर बोधचिन्ह कवी व ग्राफिक्सकार रामकृष्ण चनकापुरे यांनी डिझाइन केले असून त्याबद्दल झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष अरुण झगडकर , ज्येष्ठ मार्गदर्शक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, सुनील बावणे, प्रभा चौथाले, नागेंद्र नेवारे, वर्षा भांडारवार, गणेश मांडवकर , विजय लाडेकर, नामदेव पिजदूरकर, परमानंद जेंगठे, पंडित लोंढे, प्रशांत भंडारे,  सुनील पोटे, सुरेश डांगे, संतोष मेश्राम, मंगला गोंगले आदींनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here