योग नृत्य परीवार मूलचा वर्धापन दिन साजरा

60

मूल : योग नृत्य परीवार चंद्रपूरचे संस्थापक गोपालजी मुंधडा यांचे सहकार्याने आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा श्री माँ दुर्गा मंदीर सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे मार्गदर्शनात कार्यरत असलेल्या मूल येथील योग नृत्य परीवाराचा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला. स्थानिक दुर्गा मंदीर प्रांगणात संपन्न झालेल्या कार्यक्रमास योग नृत्य परीवार चंद्रपूरचे संस्थापक सदस्य सुरेश घोडके, प्रशिक्षक सुरज घोडमारे, प्रशांत कत्तुरवार, प्रमोद बावीस्कर, रंजना मोडक, स्थानिक ज्येष्ठ सदस्य रमेश चिलके, निवृत्त प्राचार्य बंडुभाऊ गुरनुले, माजी नगरसेवीका रत्नमाला ठाकरे आदी उपस्थित होते. चिमुकल्यांच्या शुभहस्ते केक कापल्यानंतर स्थानिक प्रशिक्षक कल्पना म्हस्के, रत्नमाला ठाकरे, राधीका बुक्कावार, सिमा भसारकर, अश्वीनी कावडकर, उमा महावादिवार, रंजना चौधरी, इंदुताई मांदाडे, काळे, सविता मारटकर, विद्या नागोसे, मिनक्षी बुटले, शामा बेलसरे आणि तरूणा रस्से या प्रशिक्षका शिवाय चिञा गुरनुले, संगीता पाटील, नाजुका लाटकर, रोहीणी बनकर, ज्योती चटारे, वैशाली बोकारे, वैशाली घुगरे, मिनाक्षी छौंकर आणि मिराताई शेंडे यांचा मान्यवरांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना व संचलन संयोजक संजय पडोळे यांनी तर आभार सहसंयोजक गुरू गुरनुले यांनी मानले. अल्पोहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here