मूल : महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शालेय शिक्षण व साक्षरता विभाग आणि एनसीईआरटी नवी दिल्ली ,महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय कला उत्सव एकपात्री नाटय स्पर्धेत किमया किरण खोब्रागडे ही विदयार्थीनी राज्यात प्रथम आली.मूल येथील माऊंट कॉन्व्हेंटची वर्ग 9 वीची विदयार्थीनी आहे. तिची राष्टीय स्तरावरील स्पर्धेत निवड झाली आहे.एकपात्री नाटय स्पर्धेसाठी ती महाराष्टाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.राज्यस्तरीय कला उत्सव पुणे येथील महात्मा फुले सभागृहात पार पडला. विदयार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्या सुप्तकलागुणांना चालना देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांच्या मार्फत या कला उत्सवाचे आयेाजन करण्यात आले होते.सन २०१५-२०१६ पासून दरवर्षी कला उत्सवाचे आयोजन करण्यात येते.शास्त्रीय गायन,पारंपारिक गायन,तालवादय,स्वरवादय वादन,शास्त्रीय नृत्य,पारंपारिक लोकनृत्य,दीमितीय चित्र,त्रिमितीय शिल्प, व खेळणी तयार करणे,नाटय— भूमिका अभिनय या दहा कला प्रकारांचा यात समावेश आहे.माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील वर्ग ९ वी ते १२ वीच्या विदयार्थ्यासाठी ही स्पर्धा होती. एकपात्री नाटयस्पर्धेत राज्यातून प्रथम आलेल्या किमयाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कवठी येथील शहीद सुरेश पाटिल सुरकर विदयालयाचे मुख्याध्यापक किरण खोब्रागडे आणि जिल्हा परिषद शिक्षिका वैशाली खोब्रागडे तसेच शिक्षकांनी किमयाला मार्गदर्शन केले. आपल्या यशाचे श्रेय किमयाने मुख्याध्यापक रिमा कांबळे,उपमुख्याध्यापक अस्पाक सयद, शिक्षक वर्ग आणि आईवडिलांना दिले आहे.