“हद्द ” एक मर्यादा चित्रपटाला चंद्रपूरकरांनी दिला भरभरून प्रतिसाद |

126
चंद्रपूर (का.प्र.)
        हद्द ” एक मर्यादा हा चित्रपट दि. १५ आक्टोंबर शनीवार रोजी स्थानिय प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाटयगृहात फक्त ३ शो मध्ये दाखविण्यात
आला. त्यावेळी चंद्रपूरकरांनी जो प्रतिसाद दिला तो अवर्णनीय आहे .
           सविस्तर असे कि, चंद्रपूर शहरातील हॉस्पीटल वार्ड रहिवासी देवा बुरडकर (फोटोग्राफर) आणी तुकूम निवासी प्रीतम खोब्रागडे फोटोग्राफर) या दोन मित्रांनी एस. के. बॅनर खाली “हद्द ” “एक मर्यादा या शिर्षकाने चंद्रपूरातील पहिला मराठी चित्रपट तयार केला. ज्यामध्ये सबकुछ चंद्रपूरातच आहे कलावंत , निर्माता , गायक सारेच चंद्रपूर अथवा चंद्रपूर जिल्हा असेच आहे. हा चित्रपट काढण्यामागे एकच उद्देश होता वारंवार मानवी वस्तीवर वन्य प्राण्यांचे आगमनाच्या घटनेत सातत्याने वाढच होत आहे . यावर शासन व जनता यांना कुठेतरी अंतर्मुख होण्याची गरज आहे. ती दखल समाजाने सुध्दा स्वीकारावी यासाठी चित्रपटाची निर्मीती झाली. असे देवा व प्रितमला वाटते .यात प्रजेश घडसे, प्रशांत कक्कड, प्रकाश वाघमारे संजय रामटेके, के राजू, अमित शास्त्रकार ,धीरज गोगुलवार, शुभम भगत, मनोज तोकला , मनीष आंबेकर, शंकर दास , ज्योत्स्ना निमगडे, प्रदिप निमगडे
  राजेंद्र वालदे, मृणाल कांबळे, अनुप वानखेडे , रमेश तांडी , गिरीश खोब्रागडे, प्रशिक वाहने, विनोद शेंडे, आबीद शेख ,अफरोज पठाण पाहुणा ,कलाकार प्रकाश परमार (मुक्त वृत्तछायाचित्रकार ) एका दृष्यात भाव खाऊन गेला.
चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी दिप प्रज्वलन केले. योगनृत्य संस्थापक गोपालजी मुंधळा, सुभाष शिंदे ,डॉ. धनंजय तावाडे, शैलेश दुपारे , देवा बुरडकर
प्रीतम खोब्रागडे यांचे हस्ते दिप प्रज्वलन होऊन राष्ट्रगीताने व वंदेमातरम घोषणांनी चित्रपट सुरु करण्यात आला.
       फक्त 3 च शो हाउसफूल्ल व तोबा गर्दी प्रमोशन पूर्वी राष्ट्रगीत, फोर व्हीलर
समोर कट आउट, लोकांच्या लाईव्ह मुलाखती . या चित्रपटातील गीत गीतकार/ संगीतकार / गायक युवराज गोंगले यांनी गायले असुन बाबा ये ना परत एकदा… अल्पावधीत लोकप्रिय झालं.
      डॉ.धनंजय तावाडे सर ( झुम्बा ग्रुप चंद्रपूर ) तिकीट विक्रीसाठी भरीव मदत केली . फक्त 3 च शो पैकी प्रत्येक शोला प्रत्येकी तीन लक्की ड्रॉ काढून प्रेक्षकांना निर्मात्यांनी भेट म्हणून दिल्या. या चित्रपटातील उत्स्फूर्त प्रतिसाद व जनतेचे प्रेम अर्थातच “हद्द’ एक मर्यादाला चंद्रपुरकरांनी जे यश दिले
ते अमर्याद आहे सर्व चंद्रपुरकरांचे जाहिर आभार देवा व प्रितम यांनी दिलेल्या एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here