- मूल : ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजात निष्काळजीपणा व गैरवर्तणुक करून पदाचा दुरूपयोग केल्याचे तपासाअंती सिध्द झाल्याने चांदापूर ग्राम पंचायतीच्या सरपंचा सोनी देशमुख यांचेसह सदस्य विनोद कोहपरे आणि प्रफुल तिवाडे यांना नागपूर विभागीय अपर आयुक्त डाॅ. माधवी खोडे चवरे यांनी अपात्र ठरविल्याने स्थानिक राजकारणात खळबळ माजली आहे.
चांदापूर ग्राम पंचायतीचे उपसरपंच अशोक मार्गनवार यांची तक्रार आणि जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुषंगाने नागपूर विभागीय अपर आयुक्त यांनी चांदापूर ग्राम पंचायतीची चैकशी केली. केलेल्या चैकशी नंतर सादर करण्यांत आलेल्या अहवालात सरपंच सोनी देशमुख आणि सदस्य विनोद कोहपरे व प्रफुल तिवाडे यांनी सदस्य पदाच्या कार्यकाळात मालमत्ता नष्ट करणे, आर्थिक हानी करणे, ठरावाची अंमलबजावणी न करणे, कर्तव्य पाळण्यात कसूर करणे, स्मशानभुमी जागेबाबत न्यायालयाच्या निर्णयानुसार कारवाई करण्यास प्रशासनास आडकाठी आणणे, गावांचे कामकाज करतांना पारीत ठरावानुसार कामकाज करणे अनिवार्य असते परंतू सरपंच देशमुख आणि सदस्य प्रफुल तिवाडे व विनोद कोहपरे हे पारीत ठरावानुसार अंमलबजावणी न करता वारंवार शासकिय कामात अडचणी निर्माण करणे, घरकुल योजने बाबत शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन न करता लाभार्थ्यांना हेतुपुरसर डावण्याचे काम करणे, खोटी व बनावट माहिती तयार करून प्रशासनाची दिशाभुल करणे, उपसरपंच यांना मानधनाचे धनादेश देण्यास टाळाटाळ करणे, गावांच्या विकासा करीता शासनाकडून प्राप्त झालेला 14 आणि 15 वा वित्त आयोगाच्या अखर्चित निधीबाबत दुर्लक्ष करणे आदि प्रकारात कसुर केल्याचे सिध्द होत असल्याने सरपंच सोनी देशमुख, सदस्य विनोद कोहपरे आणि प्रफुल तिवाडे हे महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958 चे कम 39 (1) नुसार कार्यवाहीस पात्र ठरत असल्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅनसन यांनी विभागीय आयुक्त यांचेकडे सादर केला होता. सादर केलेल्या अहवालानुसार अपर आयुक्त डाॅ. माधवी खोडे चवरे यांनी ग्राम पंचायत चांदापूर येथील दस्तऐवज आणि प्रत्यक्ष पुराव्याच्या तपासणी अंती सरपंच सोनी देशमुख आणि सदस्य विनोद कोहपरे व प्रफुल तिवाडे यांना अपात्र ठरविले आहे. सदस्यत्व कायम राहावे म्हणून सरपंच सोनी देशमुख आणि दोन्ही सदस्यांनी तालुक्यातील भाजपा आणि काॅंग्रेसच्या नेत्यांकडून युध्दपातळीवर प्रयत्न केले. राजकिय दबाव आणुन प्रकरणाचा निपटारा होण्यास वेळ मारून नेलीण् शेवअी मात्र कायदयानुसार झालेल्या कार्यवाहीत चांदापूर येथील सरपंच सोनी देशमुख यांचेसह सदस्य विनोद कोहपरे आणि प्रफुल तिवाडे यांना सदस्य पदावरून अपात्र ठरविल्याचे आदेश दिले आहे. त्यामूळे स्थानिक राजकारणात खळबळ माजली असून एका भाजप नेत्याच्या मार्गदर्शनात अपर आयुक्त यांचे आदेशाविरूध्द अपील करण्याची तयारी अपात्र सदस्यांनी चालविली असल्याचे बोलल्या जात आहे.
Home Breaking News चांदापुर येथील सरपंच व दोन सदस्य अपाञ, विभागीय अपर आयुक्ताच्या आदेशाने चांदापुर...