सेवानिवृत्त तहसिलदार वसंतराव बुक्कावार यांचे निधन

30

मूल : सेवानिवृत्त तहसिलदार तथा ज्येष्ठ नागरिक वसंतराव बुक्कावार (८५ वर्षे) यांचे आज पहाटे ४ वाजता हृदयविकाराने निधन झाले. स्थानिक गुरूकृपा राईस मिलचे संचालक प्रविण बुक्कावार आणि श्रीकांत बुक्कावार यांचे ते वडील होते. १९९१ ते १९९६ सलग पाच वर्षे त्यांनी मूल तालुक्याचे तहसिलदार म्हणुन कार्यभार सांभाळला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील तोहगांव येथील रहीवासी असलेले वसंतराव बुक्कावार यांचे मूळ गाव गोंडपिपरी तालुक्यातील तोहगाव असुन सेवानिवृत्ती पासुन ते त्यांचे कुटूंबीय मुल येथे कायमचे रहीवासी झाले आहेत. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मूल, दोन मूली, दोन स्नुषा आणि नातवंड असा मोठा परीवार आहे. स्व. वसंतराव बुक्कावार यांचे वर आज (२४/१२/२०२३) रोजी संध्याकाळी ५ वा. उमानदी तिरावर अंत्यसंस्कार होणार असुन आज दुपारी ४ वाजता त्यांचे निवासस्थानावरून अंत्ययाञा निघणार आहे. स्व. वसंतराव बुक्कावार यांना मूल टुडे परीवारा तर्फे विनम्र श्रध्दांजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here