मूल : सेवानिवृत्त तहसिलदार तथा ज्येष्ठ नागरिक वसंतराव बुक्कावार (८५ वर्षे) यांचे आज पहाटे ४ वाजता हृदयविकाराने निधन झाले. स्थानिक गुरूकृपा राईस मिलचे संचालक प्रविण बुक्कावार आणि श्रीकांत वसंतराव यांचे ते वडील होते. १९९१ ते १९९६ सलग पाच वर्षे त्यांनी मूल तालुक्याचे तहसिलदार म्हणुन कार्यभार सांभाळला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील तोहगांव येथील रहीवासी असलेले वसंतराव बुक्कावार यांचे मूळ गाव गोंडपिपरी तालुक्यातील तोहगाव असुन सेवानिवृत्ती पासुन ते त्यांचे कुटूंबीय मुल येथे कायमचे रहीवासी झाले आहेत. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मूल, दोन मूली, दोन स्नुषा आणि नातवंड असा मोठा परीवार आहे. स्व. वसंतराव बुक्कावार यांचे वर आज (२३/१२/२०२३) रोजी संध्याकाळी ५ वा. उमानदी तिरावर अंत्यसंस्कार होणार असुन आज दुपारी ४ वाजता त्यांचे निवासस्थानावरून अंत्ययाञा निघणार आहे. स्व. वसंतराव बुक्कावार यांना मूल टुडे परीवारा तर्फे विनम्र श्रध्दांजली.
Latest article
नरभक्षक वाघाच्या दहशतीत असलेल्या ग्रामस्थांनी घेतली मुख्य वनसंरक्षकांची भेट, मागण्यांची पुर्तता न केल्यास आंदोलन...
*नरभक्षक वाघाच्या दहशतीत असलेल्या ग्रामस्थांनी घेतली मुख्य वनसंरक्षकांची भेट*
*मागण्यांची पुर्तता न केल्यास आंदोलन करू. संतोषसिंह रावत यांचा इशारा*
मूल : शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये दहशत पसरविणाऱ्या...
पंधरा दिवसात पाच जणांचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर वाघांचा बंदोबस्त करावा, संतोषसिंह रावत यांचा आंदोलनाचा...
मूल : पंधरा दिवसाच्या कालावधीत तालुक्यातील पाच जणांचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेला. त्यामूळे जनसामान्यांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली असून जीवघेण्या वाघांचा बंदोबस्त करावा. अशी...
श्रीकृष्ण हुड्डा यांची सेवानिवृत्त कर्मचारी सेलच्या सोनीपत विधानसभाध्यक्ष पदावर निवड
मूल : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत वाहन चालक पदावर सेवारत राहीलेले, बँकेचे विद्यमान अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचे एकेकाळचे...