बिबट्याने कालवडला पळविले

75

बिबट्याने कालवडला पळविले
टेकडी येथील घटना
मूल :- गाईच्या गोठ्यातून एका कालवडला बिबट्याने उचलल्याची घटना शुक्रवारी रात्री टेकाडी येथे घडली. कालवड टेकाडी येथील रघुनाथ ऋषी मोहुर्ले यांच्या मालकीचा होता. बिबट्याने याच कालवड ला गुरुवारी गंभीर जखमी केले होते. त्यानंतर शुक्रवारी याच कालवडला बिबट्याने गोठ्यातून उचलून नेले. बिबट्याने कालवडला जंगलात कोणत्या भागात नेले याचा अध्याप शोध लागलेला नाही. कालवड एक वर्षाचा होता. याबाबत रघुनाथ ऋषी मोहुर्ले यांनी सावली येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. वनविभागाने याबाबत पंचनामा केला. बिबट्याच्या शोधासाठी वनविभाग कडून गस्त वाढविण्यात आली आहे. बिबट्याने कालवड उचलून नेल्याने रघुनाथ मोहुर्ले यांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाईची त्यांनी मागणी केली आहे. याआधी टेकाडी येथे अस्वलाने एका इसमास जखमी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here