वाघाच्या हल्यात गुराखी ठार, तालुक्यातील काटवन जंगलातील घटना

13

मूल : तालुक्यातील काटवन जंगलातील कक्ष क्र. ७५६ मध्ये शेळ्या चारण्या करीता गेलेल्या चिचोली येथील देवाजी वारलु राऊत (५०) ह्याचेवर हल्ला करून नरभक्षी वाघाने त्याचा बाळी घेतल्याची घटना आज संध्याकाळी ४.३० वा. चे दरम्यान घडली. घटनेची माहीती होताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतक देवाजी राऊत यांचे पार्थीव लागलीच उपजिल्हा रूग्णालय मूल येथे शवविच्छेदना करीता पाठविण्यात आले. घटनास्थळी वनपरीक्षेञ अधिकारी राहुल कारेकर, क्षेञ अधिकारी गजानन वरगंटीवार, वनरक्षक परचाके, बुरांडे यांनी भेट देवुन पाहणी करत नरभक्षी पट्टेदार वाघ आहे किंवा बिबट याचा शोध घेण्यासाठी कँमेरे लावण्यात आल्याचे वनपरीक्षेञ अधिकारी कारेकर यांनी सांगीतले. मृतक देवाजी यांच्या कुटूंबाला २० हजार रूपयाची तातडीची मदत देण्यात आली. मृतकाचे पश्चात पत्नी आणि मूल आहेत. काटवन परीसरात यापुर्वीही वाघाने हल्ला करून तीन ते चार जणांचा जीव घेतला आहे. त्यामूळे परीसरात दहशत पसरली आहे.,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here