मूल : गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या म्हणत शहरातील गणपती विसर्जन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शांततेत पार पडले. परंतू प्रशासनाच्या दुर्लक्षामूळे गांधी चौकात निर्माण झालेल्या तीन मंडपामूळे वाहतुकी सोबतचं ध्वनी प्रदुषणाचा नाहक त्रास नागरीकांना सहन करावा लागला.
बुधवारी रात्री शहरातील 32 सार्वजनिक गणेश मंडळाने गणेश विसर्जनाच्या शोभायात्रा काढून बस स्थानक लगतच्या तलावात श्री गणेशाचे विसर्जन करत भावपुर्ण निरोप दिला. गणेश विसर्जनाचे निमित्याने स्थानिक पोलीस प्रशासनाने शांतता समितीच्या सभेत साार्वजनिक गणेश मंडळांना शांतता व सुव्यवस्था राखण्यासोबतचं शासनाने दिलेल्या ध्वनी आणि प्रकाश प्रदुषणाचे नियम पाळण्याचे निर्देश दिले. परंतु एकाही गणेश मंडळाने शांतता समितीच्या सभेत दिलेल्या निर्देशाचे पालन केल्याचे दिसून आले नाही. प्रमाणाच्या बाहेर डि.जे. वाजत होते तर लेझर लाईटच्या वापरावर बंदी असतांना लेझर लाईटच्या प्रखर प्रकाशात युवा पिढी नाचत होती. शोभायात्रे दरम्यान स्थानिक गांधी चौक आणि शोभायात्रेच्या मुख्य मार्गावर नागरीकांची प्रचंड गर्दी असतानाही सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी जाळपोळ किंवा अपघाताची भिती न बाळगता पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांसमोर बिनधास्त फटाक्यांची आतिषबाजी करतांना दिसले. गणेश विसर्जनाचे दिवशी दरवर्षी स्थानिक गांधी चौकात प्रशासनाच्या वतीने नियंत्रण ठेवणे अधिका-यांना सोईचे व्हावे म्हणून मंडप उभारण्यांत येत होते. यावर्षी मात्र प्रशासनाने मंडप न उभारण्याचा निर्णय घेतल्याने प्रमुख राजकिय पक्षानी संधी साधली. राज्य विधानसभेची निवडणुक तोंडावर असल्याची संधी साधून प्रचाराची धुमाळी चालविली. श्री गणेश विसर्जनाकरीता येणा-या नागरीकांसमोर शक्ती प्रदर्शन करीण्याकरीता भाजपा, काॅंग्रेस आणि शिवसेनेच्या वतीने गांधी चौकात वेगवेगळे तीन मंडप उभारले होते. भाजपाच्या मंडपात जिल्हयाचे पालकमंत्री तथा क्षेत्राचे आ. सुधीर मुनगंटीवार समर्थकांसह उपस्थित होते तर महाविकास आघाडीने उभारलेल्या मंडपात संतोषसिंह रावत, घनश्याम मुलचंदानी आणि शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गि-हे आणि शिवसेना उबाठा गटाच्या मंडपात शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गि-हे आपआपल्या समर्थकांसह उपस्थित होते. उभारण्यांत आलेल्या राजकिय पक्षांच्या तीनही मंडपामध्यें कर्कश आणि मोठया आवाजात भोंगे व साऊंड वाजविल्या जात असल्याने गांधी चौकात ध्वनी प्रदुषणाची गंभीर समस्या निर्माण झाली होती. हया सर्व घटना कायदयाचे उल्लंघन करून घडत असतांना प्रशासनाला मात्र नाईलाजाने बघ्याची भुमीका स्विकारावी लागली, याविषयी आश्चर्य व्यक्त करण्यांत येत आहे.