मूल : स्थानिक संतोषसिंह रावत मित्र परिवाराचे वतीने गणेशोत्सवा निमित्य घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजीत केली होती. तीन गटात घेण्यांत आलेल्या सदर स्पर्धेत शहरातील 65 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सहभागी स्पर्धकांनी सादर केलेल्या गणेशाचा मुर्तीचा आकार, स्वरूप, रंगरंगोटी, मंचाची सजावट आणि सजावटी मधून दिलेला संदेश व विषय लक्षात घेवून परिक्षकांनी मुल्यांकन केले. त्यानुसार अ गटामधून यश संतोष गाजुलवार याने प्रथम तर धनंजय बद्देलवार हे द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले, ब गटात पंकज आसमवार प्रथम तर आराध्या काळे द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली, अधिरा माथनकर हीला प्रौत्साहनपर बक्षीस देण्यांत आले. क गटात प्रविण रतीलाल राजा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. अविनाश बंडावार द्वितीय तर मानस लोणारे प्रौत्साहनपर बक्षीसाचे मानकरी ठरले. विजेत्या सर्व स्पर्धकांना श्री गणेश विसर्जनाचे दिवशी स्थानिक गांधी चौकात पार पडलेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गि-हे आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे हस्ते रोख बक्षीस देण्यांत आले. यावेळी बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, माजी सभापती घनश्याम येनुरकर, ज्येष्ठ कार्यकर्ते भास्कर माकोडे, राजु मारकवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन अतुल गोवर्धन यांनी तर गुरू गुरनूले यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विजेत्या स्पर्धकांशिवाय त्यांचे पालक आणि नागरीक मोठया संख्येनी उपस्थित होते.