शिक्षक भिडले प्रचारात, पार्ट्यांना उधान, प्राथमिक शिक्षक सहकारी पत संस्थेची निवडणुक रंगतदार होणार

11

मूल : 13 संचालक पदासाठी एकुण 37 उमेदवार रिंगणात असल्याने सावली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पत संस्थेची निवडणुक रंगतदार होत असून पत संस्थेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी रिंगणातील तीनही आघाडया युध्दपातळीवर प्रचारात लागले आहे.

जिल्हा परिषद अधिनस्त असलेल्या सावली आणि मूल तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी संघटीत होवून स्थापन केलेल्या प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पत संस्था मर्या सावलीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक येत्या 14 जूलै रोजी होत आहे. पत संस्थेचे मुख्य कार्यालय सावली येथे असले असले तरी संस्थेचे सभासद असलेले बहुतांश शिक्षक मूल येथे वास्तव्याने आहेेत. त्यामूळे निवडणुक प्रचाराची रणधुमाळी मूल येथे चांगलीच गाजत आहे. शाळेच्या वेळेनंतर रिंगणात असलेल्या आघाडयांची कार्यालये प्रचाराच्या निमित्याने शिक्षकांनी फुलून जात असून अनेक ठिकाणी शिक्षकांचे जत्थे चर्चा करतांना दिसत आहेत. निवडणुकीत नशिब अजमावत असलेले शिक्षकवृंद समुहाने मतदारांच्या भेटीगाठी घेत असून प्रचाराच्या निमित्याने कां होईना पाटर्यांना उधान आल्याचे ऐकीव्यात आहे. यावर्षी प्रथमचं सत्तारूढ आघाडीच्या विरूध्द दोन आघाडयांनी दंड थोपटले आहे. किशोर आनंदवार, विलास आळे, जितेंद्र लेनगुरे, पुरूषोत्तम टोंगे, नामदेव निखाडे, सुधाकर चरडुके आणि प्रब्रम्हानंद मडावी आदिंच्या नेतृत्वात विमान बोधचिन्ह घेवून अखील पुरोगामी एकता आघाडीकडून राजेंद्र कतलामी, नितीन कुनघाडकर, संदीप कोहळे, लोमेश बोरेवार, जीवन भोयर, सुंदर मंगर, प्रकाश शेंडे आणि केदारनाथ सोनुले हे उमेदवार सर्वसाधारण गटात उभे असून संतोष दळांजे अनुसुचित जाती/जमाती,सतिश कहुरके वि.जा.भ.ज. प्रवर्गात तर लक्ष्मण खोब्रागडे इमाव गटातून नशीब अजमावत आहेत. वर्षा मुलकलवार आणि मालती सेमले या महिलांसाठी आरक्षीत असलेल्या प्रवर्गात उभ्या आहेत. परीवर्तन आघाडीकडून भक्तदास कांबळे, आकाश कुकुडकर, सुनिल खंडाळे, स्वप्नील डोईजड, विजय बावणे, सुखदेव मांदाडे, संतोष सिडाम आणि लक्ष्मण सोयाम सर्वसाधारण गटात तर आदेश मानकर अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गात रिंगणात आहेत. विद्या कोवासे आणि रजनी रामगिरवार हया महिलांसाठी आरक्षीत असलेल्या गटात तर सुरेश जिल्हेवार वि.जा.भ.ज. आणि चंदन बिलवणे इमाव गटात नशीब अजमावत आहेत. कपबशी बोधचिन्ह घेवून नशीब अजमावत असलेल्या परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी संतोष कुंटावार, रत्नमाला गेडाम, किशोर उरकुंडवार, जगदिप दुधे, नंदकिशोर शेरकी आदि मंडळी जोरदार तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. यावर्षी प्रथमचं सहकार आघाडीने निवडणुक रिंगणात उडी घेतली आहे. टेबल बोधचिन्ह घेवून सहकार आघाडीचे एकुण अकरा उमेदवार नशीब अजमावत आहेत. देवेंद्र रायपुरे, कमलनयक बोरकर, दमयंती तेलसे, ललित खोब्रागडे, अविनाश सोरते, मनोज दुधे, राजेंद्र गेडाम आणि प्रियदर्शन मडावी सर्वसाधारण प्रवर्गातून उभे आहेत. आघाडीचे नेतृत्व करीत असलेले मिलींद खोब्रागडे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात तर मिलींद खंडाईत इमाव गटात नशी अजमावत आहेत. दोन संचालक निवडुन दयावयाच्या महिला गटात सहकार आघाडीने मंगला गोंगले यांनाच रिंगणात उतरवले असून विजाभज गटातून उमेदवार दिलेला नाही. विलास बंसोड, सुनिल गेडाम, मनोज गलबले, गुरूकार, युवराज दुर्गे, प्रफुल तेलसे, भारत रामटेके आदि शिक्षक सहकार आघाडीच्या उमेदवारांसाठी जीवाची बाजी लावून आहेत. त्यामूळे 13 संचालक पदासाठी एकुण 37 उमेदवार नशीब अजमावत असून येत्या 14 जूलै रोजी सावली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात मतदान होणार आहे. यापूर्वी सदर निवडणुक 17 मार्च रोजी होणार होती परंतू लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमूळे सदर निवडणुक स्थगित करून 14 जूलै रोजी घेण्यात येत असल्याने रिंगणात असलेल्या उमेदवारांना प्रचाराकरीता मुबलक प्रमाणात अवधी मिळाला आहे. १३ संचालक निवडण्यासाठी ५९२ शिक्षक मतदार १४ जुलै रोजी मतदान करणार असल्यामूळे होवू घातलेल्या निवडणुकीत कोणत्या आघाडीला बहुमत प्राप्त होते. याकडे शिक्षकवृंदासोबतचं पालकांचेही लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here