बल्लारपुर विधानसभा क्षेत्राची उमेदवारी संतोषसिंह रावत यांना द्यावी, क्षेञातील शेकडो काँग्रेस पदाधिका-यांची प्रदेशाध्यक्षांना विनंती

16

 

मूल : होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा मतदार संघाची उमेदवारी काँग्रेस पक्षाने आपल्याकडे कायम ठेवून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांना द्यावी. अशी विनंती आज मूल, पोंभुर्णा आणि बल्लारपूर तालुक्यातील काँग्रेसच्या शंभराचे वर पदाधिका-यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना प्रत्यक्ष भेटून केली.
प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांचे स्वगांव असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सुकळी येथे प्रत्यक्ष भेटून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सदरची विनंती केली. मुल बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावर काँग्रेसचे मूल तालुकाध्यक्ष गुरू गुरूनुले, पोंभुर्णा तालुकाध्यक्ष वासुदेव पाल, ओमेश्वर पद्मगिरीवार, मूल शहराध्यक्ष सुनिल शेरकी, बाजार समिती उपसभापती राजेंद्र कन्नमवार, माजी तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर, पं.स.माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस गुरू चौधरी, युकाँध्यक्ष पवन निलमवार यांचे नेतृत्वाखाली आज बल्लारपूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील शंभरचेवर काँग्रेसच्या पदाधिका-यांनी सुकळी येथे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांची भेट घेतली. भेटीदरम्यान विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस विचारसरणीच्या कार्यकर्त्यांचा कित्येक वर्षाच्या राजकीय वनवास संपवण्यासाठी आमचं ठरलं म्हणत संतोषसिंह रावत सारख्या लोकप्रिय व तळागाळातील कार्यकर्ते, जनता व गावांशी संपर्क असलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी. अशी विनंती केली, काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून उमेदवारी दिल्यास क्षेत्रात प्रचंड मताधिक्याने विजय संपादन करून क्षेत्रामधुन काँग्रेसचा उमेदवार आपल्या सोबत देऊ. असा विश्वास पदाधिका-यांनी बोलून दाखविला. यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी आपली मागणी पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्वाकडे पोहोचविण्याचे आश्वासन देत विद्यमान सरकारच्या काळातील समृद्धी महामार्गा सोबतच विविध योजनांमध्ये होत असलेल्या कोट्यावधीच्या गैरप्रकारा सोबतच आपल्या जिल्ह्यातील जनतेच्या समस्यांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करून पक्षाचा प्रचार करण्याचे आवाहन केले. यावेळी देसाईगंज येथील माजी नगराध्यक्ष जेसाभाई मोटवानी यांचे सह बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सरपंच उपसरपंच उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here