शुल्लक कारणावरून युवकाचा खून, परिसरात हळहळ

17

मूल (प्रती) घराशेजारील केबल बाजूला कर, असे म्हटल्याप्रकरणी रागाच्या भरात बाप, लेकाने घराशेजारील युवकाचा कुऱ्हाडीने निर्घृण खून केला. हि हृदयद्रावक घटना तालुक्यातील हळदी येथे सकाळी 10.00 वाजता घडली. मृतकाचे नाव राजू शेषराव बोदलकर (वय 30) वर्ष आहे.घराशेजारी असलेल्या झाडाचे फांद्या तोडल्यानंतर लागूनच असलेला केबल बाजूला कर, असा प्रेमाने सांगणाऱ्या घराशेजारील युवकावर सूरज गुरुदास पिपरे (वय 21),आणि गुरुदास नक्तू पिपरे या बाप लेकाने कुऱ्हाडीने वार करून राजू शेषराव बोदलकर या युवकाचा निर्घृण खून केला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृतक हा अत्यंत शांत व संयमी स्वभावाचा होता. मृत्यु पश्चात त्याला एक मुलगा एक मुलगी व पत्नी आहे. पोलीसांनी मारेकरी पितापुञाला अटक केली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी भगत यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुमित परतेकी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here