प्रशासनाच्या दुर्लक्षामूळे रूग्णाचा मृत्त्यु, दोषीविरूध्द कारवाई करावी. उपजिल्हा रूग्णालया पार्थीव ठेवले

49

मूल : रूग्णवाहीकेची अनुप्लब्धतता आणि रूग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षामूळे एका व्यक्तीचा मृत्यु झाल्याची घटना काल मूल येथे घडल्याने रूग्ण सेवेकरीता निर्माण करण्यात आलेल्या रूग्णालयाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
तालुक्यातील ताडाळा येथील 61 वर्षीय सदु तुकाराम बावणे हा दोन दिवसापासून तापाने आजारी होता. औषधी घेतली परंतू प्रकृतीमध्यें थोडीही सुधारणा झाली नाही. म्हणून त्याच्या पत्नीने सदूला मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात काल दुपारी 12 वाजता उपचारार्थ भरती केले. कर्तव्यावर असलेल्या महिला वैद्यकिय अधिका-यांनी तपासणी करून उपचार सुरू केले, परंतू पाहिजे त्या प्रमाणात सदुच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे लक्षात आल्याने दुपारी 2 वाजताचे दरम्यान सदुला चंद्रपूरला हलविण्याचा वैद्यकिय अधिका-यांनी सल्ला दिला. परंतू आर्थिकदृष्टया गरीब असलेल्या सदुच्या पत्नीकडे सदूला चंद्रपूरला हलविण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. म्हणून तीने पुतण्याच्या मदतीने 108 नंबरच्या रूग्णवाहीकेकरीता काॅल केला. परंतू 5 वाजेपर्यंत 108 क्रमांकाची रूग्णवाहीका उपलब्ध झाली नाही, दरम्यान सदूची प्रकृती पुन्हा खालावू लागल्याने उप जिल्हा रूग्णालयात उभ्या असलेल्या 102 क्रमांकाच्या रूग्णवाहीकेसाठी प्रयत्न करण्यात आले. परंतू 102 क्रमांकाच्या रूग्णवाहीकेमध्येें डिझेल भरण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने ती रूग्णवाहीका देण्यासाठी रूग्णालय प्रशासन तयार नव्हते. शेवटी सदूच्या पत्नीने पैसे उसनवार घेवून डिझेलची व्यवस्था केल्यानंतर 6 वाजताचे सुमारास 102 कमांकाच्या रूग्णवाहीकेमधून सदूला आँयेक्सीजन लावून चंद्रपूरला रवाना केले. परंतू लावण्यात आलेले आँक्सीजन जानाळा समोर संपल्याने रूग्णवाहीकेमध्येंच सदू अस्वस्थ झाला. दरम्यान जानाळा समोर 108 क्रमांकाची रूग्णवाहीका उपलब्ध झाल्याने 102 क्रमांकाच्या रूग्णवाहीकेमधून सदूला 108 क्रमांकाच्या रूग्णवाहीकेमध्यें ठेवून चंद्रपूरला नेण्यात आले. जिल्हा सामान्य रूग्णालयात पोहोचल्यानंतर प्राथमिक तपासणी केली असता अर्ध्या तपासापूर्वीच सदूचे निधन झाल्याचे वैद्यकिय अधिका-यांनी सांगीतले. 108 क्रमांकाची रूग्णवाहीका वेळेवर उपलब्ध झाली असती आणि लावण्यात आलेले आँक्सीजन जानाळा येथे संपले नसते तर सदूचा मृत्यु टळला असता. परंतू 108 क्रमांकाच्या रूग्णवाहीकेची विलंबाने उपलब्धता आणि उप जिल्हा रूग्णालय प्रशासनाने लावलेले आँक्सीजन सिलेंडर दहा मिनीटात संपल्याने केवळ तापाच्या आजारात आवश्यक सुविधा उपलब्ध न झाल्याने सदूचे निधन झाले. असा आरोप मृतक सदूच्या नातेवाईकांनी केला आहे. रूग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षामूळे सदूचे निधन झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी सदूचे पार्थीव उपजिल्हा रूग्णालयात घेवून आले. सदूच्या निधनाला जबाबदार असलेल्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यांत यावी. अशी मागणी करत मृतक सदूचे नातेवाईक आणि ताडाळा येथील नागरीकांनी उपजिल्हा रूग्णालयातून सदूचे पार्थिव उचलण्यास नकार दिला. घटनेची माहिती होताच बाजार समिती उपसभापती राजेंद्र कन्नमवार, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार, राकाॅंपाचे मंगेश पोटवार आणि आकाश येसनकर यांनी कार्यकत्र्यांसह रूग्णालय गाठून नातेवाईकांच्या मागणीला समर्थन जाहीर केल्याने रूग्णालय परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलीस अधिका-यांनी संतप्त झालेल्या पदाधिकारी आणि नगरीकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतू कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन जो पर्यंत मिळत नाही, तो पर्यंत सदूचे पार्थीव न उचलण्याचा निर्णय घेतला. शेवटी मध्यरात्री 1 वाजताचे दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. चिंचोळे यांनी उप जिल्हा रूग्णालयाला भेट देवून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मृतक सदूचे पार्थिव उचलण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here