पोलीस चौकीत पुरेसे कर्मचारी नियुक्त करून नागरीकांना संरक्षण द्यावे, बेंबाळचे उपसरपंच ध्यानबोईवार यांचे पोलीस अधिक्षकाला पञ

62

मूल : पोलीस स्टेशन मूल अंतर्गत पोलीस दुरक्षेत्र बेंबाळ येथे पुरेसे व नियमित पोलीस कर्मचारी नियुक्त करून परिसरात घडत असलेल्या गुन्हयांच्या घटनांवर आळा घालावा. अशी विनंती बेंबाळ ग्राम पंचायतीचे उपसरपंच देवाजी ध्यानबाईवार यांनी केली आहे.

कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्याचे दृष्टीने आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालणे पोलीस प्रशासनाला सोयीचे व्हावे म्हणून तालुक्यातील बेंबाळ आणि चिरोली येथे पोलीस दुरक्षेत्र निर्माण करण्यांत आले. कित्येक वर्षापासून कार्यरत असलेल्या बेंबाळ पोलीस दुरक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात परिसरातील २४ गावांचा समावेश असुन पोलीस दुरक्षेञ चिरोली हद्दीत २१ गांव येतात. लोकसंख्येच्या दृष्टीनेही बेंबाळ आणि चिरोली हे दोन्ही भाग मोठे आहेत. त्यामूळे बेंबाळ परिसरातील 24 गावांत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने काम करण्यासाठी याठिकाणी १ अधिकारी आणि ६ कर्मचारी असे सात कर्मचारी मंजुर असुन पोलीस दुरक्षेञ चिरोली येथे १ अधिकारी आणि ४ कर्मचारी नियुक्त आहेत. परंतू सध्याचे परिस्थितीत पोलीस दुरक्षेत्र बेंबाळ येथे केवळ दोन पोलीस कर्मचारी नियुक्त असून चिरोली येथे ३ कर्मचारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवुन आहेत. बेंबाळ पोलीस दुरक्षेञाचे हद्दीतील २४ गावांचा भार केवळ २ कर्मचाऱ्यांवर आहे. अधिका-याविना असलेल्या बेंबाळ पोलीस दुरक्षेत्राच्या परिसरात मागील सहा महिण्यांपासून घरफोडी आणि चो-यांचे प्रमाण वाढले आहे. यामूळे नागरीकांमध्यें दहशत पसरली असून मंजुर कर्मचा-यांपैकी केवळ दोन कर्मचा-यांवर २४ गावांत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने लक्ष ठेवण्याची जबाबदारी असल्याने त्यांचे याकडे मोठया प्रमाणांत दुर्लक्ष होत आहे. याची संधी साधुन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळीचे चांगलेच फावत असल्याने यांचेवर आळा घालण्यासाठी मंजुर असलेल्या कर्मचा-यांपैकी किमान कर्मचारी नियुक्त करण्यात यावे. अशी मागणी उपसरपंच देवाजी ध्यानबोईवार यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे कडे केली आहे. सदर मागणीचे निवेदन नुकतेच त्यांनी उपजिल्हा पोलीस अधिक्षक यांना दिले असून जनतेच्या मनातील भितीचे सावट कमी करण्याची विनंती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here