मूल : राष्ट्रवादी कॉंग्रसेचे ज्येष्ठ नेते, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषदचे राष्टीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्यावर हल्ला करणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देऊ, अशी घोषणा करणाऱ्या विश्वजीत देशपांडेवर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करा. अशी मागणी महात्मा फुले समता परीषद चंद्रपूर पूर्व यांचे वतीने पोलीस निरीक्षक सुमीत परतेकी यांना देशपांडे वर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. छगन भुजबळ हे समता परीषदेच्या माध्यमातून देशामध्ये पुरोगामी विचारसरणीची चळवळ घेऊन काम करीत आहेत. ओबीसी व बहुजनाच्या न्याय हक्कासाठी ते सदैव झटत असतात. ना. भुजबळ हे कँबीनेट मंत्री व प्रतिष्ठीत व्यक्तीमत्व असून त्यांच्यावर हल्ला करण्यास प्रवृत्त करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्याचा व समाजात वाद निर्माण करण्याचा दुष्ट हेतू ठेवून विश्जीत देशपांडे यांनी भुजबळांवर हल्ला करण्याचे आवाहन केले आहे. हे लोकशाही ला अभिप्रेत नाही. विचारांची लढाई विचारांनी लढावी या करीता देशपांडे वर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी या करीता मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांना निवेदन देण्यात आले. अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले, समता परीषदेचे जिल्हा सल्लागार माजी जि.प.सदस्य प्रा. रामभाऊ महाडोरे, महिला जिल्हा कार्याध्यक्ष शशिकला गावतुरे, माळी महासंघाचे विभागीय महासचिव तथा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, माळी महासंघाचे प्रा. सुधीर नागोशे शहर अध्यक्ष राकेश मोहुर्ले, चिमढा सरपंच कालिदास खोब्रागडे, उपसरपंच योगेश लेनगुरे, चिरोली माजी सरपंच अनिल शेंडे, जिल्हा सहसचिव ईश्वर लोनबले, जिल्हाप्रतिनिधी कैलास चलाख, समता परीषदेचे रोहित निकुरे, मनीष मोहुर्ले, परशुराम शेंडे, प्रा. प्रभाकर धोटे, विनोद आंबटकर, श्रीकृष्ण शेंन्डे, मनिष शेंन्डे, प्रा.नीरज चन्ने, प्रा.पुरुषोत्तम कुनघाडकर, प्रा.विजय काटकर, प्रा.चक्रधर घोंगडे, समता परीषद पदाधिकारी दुशांत महाडोरे, श्रीकृष्ण शेंडे, ,प्रा. दिलीप वारजूरकर ,भाऊजी लेंनगूरे, समता परिषदेचे महिला पदाधिकारी सीमा लोनबले, वैशाली मशाखेत्री, स्मिता गुरूनुले, उषा चुदरी, दर्शना निकुरे, देवराव ढवस्, दलीत जंनबंधु, सुभाष वाढई, प्रभाकर चौधरी, सुभाष गुरूनूले, समता परिषदेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Latest article
नरभक्षक वाघाच्या दहशतीत असलेल्या ग्रामस्थांनी घेतली मुख्य वनसंरक्षकांची भेट, मागण्यांची पुर्तता न केल्यास आंदोलन...
*नरभक्षक वाघाच्या दहशतीत असलेल्या ग्रामस्थांनी घेतली मुख्य वनसंरक्षकांची भेट*
*मागण्यांची पुर्तता न केल्यास आंदोलन करू. संतोषसिंह रावत यांचा इशारा*
मूल : शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये दहशत पसरविणाऱ्या...
पंधरा दिवसात पाच जणांचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर वाघांचा बंदोबस्त करावा, संतोषसिंह रावत यांचा आंदोलनाचा...
मूल : पंधरा दिवसाच्या कालावधीत तालुक्यातील पाच जणांचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेला. त्यामूळे जनसामान्यांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली असून जीवघेण्या वाघांचा बंदोबस्त करावा. अशी...
श्रीकृष्ण हुड्डा यांची सेवानिवृत्त कर्मचारी सेलच्या सोनीपत विधानसभाध्यक्ष पदावर निवड
मूल : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत वाहन चालक पदावर सेवारत राहीलेले, बँकेचे विद्यमान अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचे एकेकाळचे...