आरोग्य शिबीराचा घेतला हजारो गरजुंनी लाभ, संतोषसिंह रावत मिञ परीवाराने राबविला स्तुत्य उपक्रम

42

मूल : कार्ये जनकल्याणकारी, सामान्य जनतेच्या दारी हे ब्रिद डोळयासमोर ठेवून गोरगरीब जनतेला आरोग्य सेवेचा लाभ एकाच छताखाली देण्यासाठी आयोजीत केलेल्या मोफत आरोग्य तपासणी, औषधी वितरण आणि रकतगट व सिकलसेल तपासणी शिबीरात चार हजाराचे वर गरजुनी लाभ घेतला.

श्री माॅ दुर्गा मंदिर सेवा समिती आणि संतोषसिंह रावत मित्र परिवार मूलच्या संयुक्त विद्यमाने आणि दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था सांवगी मेघे यांच्या वतीने स्थानिक नव भारत विद्यालयाचे प्रांगणात मोफत आरोग्य तपासणी, औषधी वितरण आणि रकतगट व सिकलसेल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यांत आले होते. शिबिराचे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे तथा माॅ दुर्गा मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, नव भारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक झाडे, आचार्य विनोबा भावे रूग्णालयाचे डाॅ. श्रीनिवास आणि डाॅ. आनंद यांचे हस्ते दिप प्रज्वलन करून झाले. सकाळी ११ वाजता पासून सुरू झालेल्या सदर शिबिरात जनरल फिजीशियन, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, दंतरोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, नाक कान व घसा तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, त्वचारोग तज्ञ, आणि सर्जरी तज्ञ आदिंनी रूग्णाच्या आजाराची तपासणी करून उपचार सुचविले. शिबीरात ब्लड प्रेशर, ईसीजी, मेमोग्राफी, शुगर, सिकलसेल आदि प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या सोबतचं गर्भवती व स्तनदा मातांची तपासणी, लसीकरण आदि सेवा पुरविण्यांत आल्या. शिबिर काळात विरोधी पक्ष नेते ना.विजय वडेट्टीवार यांनी तयार केलेले फिरते रूग्णालय व कॅसर निदान केंद्र वाहण रूग्णांच्या सेवेकरीता उपलब्ध करण्यांत आले होते. सकाळी ११ वाजतापासून सुरू झालेले शिबीर संध्याकाळी ५ वाजता पर्यंत चालले. शिबिरात निदान करण्यांत आलेल्या हजारो रूग्णांना संतोषसिंह रावत आणि आचार्य विनोबा भावे रूग्णालय यांचे वतीने विनामूल्य औषधी वितरीत करण्यांत आले. शिबिरात जवळपास १८० जणांनी रक्तगट तपासणी करून घेतली. शिबिर स्थळी शिबीराचे मुख्य संयोजक संतोषसिंह रावत पुर्णवेळ उपस्थित राहुन रूग्णांचे समाधान करतांना दिसले. शिबिराला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड. बासाहेब वासाडे, सचिव अँड. अनिल वैरागडे आदिंनी भेट देवून कौतुक केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी स्थानिक जनरल मेडीकल प्रॅक्टीशर असोसिएशनची डाॅक्टर मंडळी, देवनील स्कुल आॕफ नर्सिगच्या विद्यार्थीनी, केमीस्ट अॕण्ड ड्रगीस्ट असोसिएशनचे फार्मसी संचालक व त्यांचे सहकारी, लेबारेटरी आणि टेक्नाॅलाॅजीस्ट असोसिएशनचे स्थानिक पॅथालाॅजीस्ट यांनी अथक परिश्रम घेतले. शिबीराच्या यशस्वी आयोजनात सहकार्य केल्या बद्दल आयोजकांच्या वतीने दत्ता मेघे संशोधन संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी डाँ. आभ्युदय मेडे आणि उपस्थित सर्व वैद्यकीय पथकाचे सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला. शिबीरात जास्तीत जास्त गरजुंना आरोग्याची सेवा देण्यासाठी सांवगी मेघे येथील डाॅ. निखीलेश नागतोडे, मुरलीधर उमाटे, अभिषेक टिकले, डाॅ. अजय कौशीक, सचिन ठाकरे, सचिन आगलावे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरू गुरनूले, शहर अध्यक्ष सुनिल शेरकी, माजी सभापती घनश्याम येनुरकर, उपसभापती संदीप कारमवार,, महिला तालुकाध्यक्ष रूपाली संतोषवार, शहर अध्यक्ष नलीनी आडेपवार, सरपंच हिमानी वाकुडकर, राहुल मुरकुटे, जितेंद्र लोणारे, माजी नगरसेवीका लिना फुलझेले, राजु मारकवार, दिपक वाढई, पवन निलमवार, सुमीत आरेकर, सुनिल मंगर, चतुर मोहुर्ले, लोमेश नागापूरे, विलास पुल्लकवार, प्रशांत उराडे, दशरथ वाकुडकर, राजेंद्र वाढई, लहुजी कडस्कर, शामलता बेलसरे, बंडु गुरनूले, हसन वाढई, व्यकंटेश पुल्लकवार, सुरेश फुलझेले, कैलास चलाख, रूपलसिंह रावत, राजेश रावत, नितीन राजा, धनंजय चिंतावार, किशोर गोगुलवार यांचेसह संतोषसिंह रावत मित्र परिवार आणि माॅ दुर्गा मंदिर सेवा समिती आणि योग नृत्य परीवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

जन सेवा हीच ईश्वर सेवा हे ध्येय समोर ठेवुन सहका-यांचे सहकार्याने आयोजित केलेल्या आरोग्य शिबीरात हजारो गरजुंना आरोग्याची सेवा पुरविता आली. याचे समाधान आणि आनंद असुन राजकारणा सोबतचं समाजकारण आणि धार्मिक कार्याला आपल्या जीवनात महत्व देणार आहे
संतोषसिंह रावत
अध्यक्ष जि.म.सह.बँक चंद्रपूर तथा माँ दुर्गा मंदीर सेवा समिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here