मूल – येथील अंतरगाव पारडवाही शेत शिवारात अरुण श्रावण चौखुंडे यांचे शेतात पट्टेदार वाघीण दिसली असुन दोन दिवसांपुर्वी येथील हेटी परीसरातील रहिवासी लक्ष्मण चौखुंडे यांच्या गायीवर हल्ला करून ठार केले. ज्या ठिकाणी वाघाने गायीची शिकार केली ते ठिकान शहरापासुन हाकेच्या अंतरावर असून संपूर्ण परिसर धान शेतीचा आहे. त्यामूळे सदर परीसरात जंगल झाड आणि झुडुप नाहीत. गावामध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे रात्रंदिवस फिरत असतात, त्यामुळे शहरा जवळ आलेला वाघ खाद्द्याच्या शोधात रात्रीच्या वेळेस शहरात सहज पोहोचु शकतो, त्यामूळे हेटी परीसरातील जनता भयग्रस्त जीवन जगत असल्याचे बोलल्या जात आहे. या परिसरात धान शेत असल्याने रात्रौ पर्यंत शेतकरी शेतात ये जा करत असतात, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटने कडे वनविभागाने विशेष लक्ष द्यावे. अन्यथा मोठी घटना घडल्या शिवाय राहणार नाही.