मूल : स्थानिक भाजपा कार्यालयात भाजपाच्या दोन जबाबदार महाभागांमध्ये फ्रिस्टाँईल झाल्याने असं हे वागणं बरं नव्हे म्हणत अनेकांनी महाभागांच्या कृतीवर धिक्कार नोंदविला तर काहींनी हे होणारचं होत म्हणत आश्चर्य व्यक्त केले.
येत्या ३० जुलै रोजी राज्याचे मंञी तथा जिल्ह्याचे पालकमंञी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्य आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासंबंधी चर्चा करण्यासाठी स्थानिक चेपुरवार काँम्प्लेक्स स्थित भाजपा कार्यालयात आज दुपारी बैठक झाली. जिल्हा पदाधिकारी रामलखीया यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला शहरातील भाजपाचे अनेक पदाधिकारी, आजी व माजी नगरसेवक उपस्थित होते. चर्चे दरम्यान एका माजी नगरसेवीकेच्या पतीने उपस्थित केलेला किरकोळ मुद्दा भाजपाच्या एका जबाबदार पदाधिका-याला पचनी न पडल्याने दोघांमध्ये शाब्दीक वाद रंगला. वाद इतका रंगला की शाब्दीक वाद थोड्याच वेळात हातघाईवर पोहोचला. दोन प्र मध्ये रंगलेल्या फ्रिस्टाँईलच्या आवाज इतका वाढला की मार्गावरून ये-जा करणारे आणि परीसरातील मंडळी कार्यालयासमोर गर्दी करून उभे झाले. शेवटी उपस्थित काही मंडळींनी मध्यस्थी करत फ्रिस्टाँईल थांबवली. तालुका समन्वय समितीचे तालुका अध्यक्ष आणि शहर दक्षता समितीच्या जबाबदार पदाधिकारी असलेले दोन्ही प्र नगर परीषदेच्या तत्कालीन पदाधिका-यांचे नवरे असुन या दोघांमध्ये मागील काही वर्षापासुन विस्तवही जात नाही. त्यामधुनच आजची फ्रिस्टाँईल झाल्याची चर्चा असुन एका जणाने तर व्हाँटसअँप ग्रृपवरच बाचाबाची झाल्याचे मान्य केले आहे. हे जरी खरं असलं तरी भाऊंचा विश्वासु पदाधिका-यांनी चक्क पक्षाच्या कार्यालयातच फ्रिस्टाँईल करावी. ही कृती अनेकांना भावली नाही. त्यामुळे अनेकांनी असं हे वागणं बरं नव्हे म्हणत तर अनेकजण छान झाल म्हणत गर्दीतुन काढता पाय घेतला.