मूल : गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्रयोगशाळेत कार्यरत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागु असलेल्या वाढीव दिर्घ अवकाश कालीन सुट्ट्या लागु कराव्या. अशी मागणी चंद्रपूर गडचिरोली जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने केली आहे.
गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डाँ. प्रशांत बोकारे आणि कुलसचिव डाँ. अनिल हिरेखन यांची भेट घेवुन दिलेल्या निवेदनात संघटनेने गोंडवाना विद्यापीठ राज्यातील इतर विद्यापीठाप्रमाणे महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नियमानुसार शिक्षक कर्मचाऱ्यांप्रमाणे उन्हाळी व हिवाळी दिर्घ अवकाश कालीन सुट्ट्या बाबतचे परीपञक काढत होते. विद्यापीठाच्या परीपञकानुसार महाविद्यालयाचे प्राचार्य महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिर्घ अवकाश कालीन सुट्ट्या देत होते. त्यानुसार गोंडवाना विद्यापीठाने २६ एप्रील आणि १७ मे २०२३ रोजी परीपञक जाहीर करून महाविद्यालयीन प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांना हिवाळी सुट्ट्या जाहीर केल्या, परंतु १४ जुन २०२३ रोजी काढलेल्या वाढीव सुट्ट्याच्या अधिसुचनेत प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांचा उल्लेख न करता केवळ शिक्षक कर्मचाऱ्यांचा उल्लेख केल्याने महाविद्यालयाचे प्राचार्य संभ्रमात पडले. वास्तविक दिर्घ अवकाश कालीन सुट्ट्या जाहीर करण्याच्या परीपञकात शिक्षक कर्मचाऱ्यांसोबतच प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांचा जसा उल्लेख केला. तसाच उल्लेख वाढीव सुट्ट्याच्या परीपञकात करावयास पाहीजे होता. परंतु विद्यापीठ प्रशासनाने वाढीव सुट्ट्याच्या परीपञकात प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांचा उल्लेख न केल्याने विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या अनेक महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांना उन्हाळी काळातील वाढीव दिर्घ अवकाश कालीन सुट्ट्या देण्यास नकार दिला. त्यामूळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयातील प्रयोगशाळा कर्मचारी वाढीव उन्हाळी दिर्घ अवकाशकालीन सुट्ट्यापासुन वंचित राहीले. विद्यापीठाकडून झालेला हा प्रकार अन्यायकारक असुन राज्यातील इतर विद्यापीठ प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांना जश्या दिर्घ अवकाश कालीन सुट्ट्या जाहीर करते. त्याप्रमाणे गोंडवाना विद्यापीठाने कार्यवाही करावयास पाहीजे होती. पण तसे न करता अन्याय केल्याने संघटनेच्या काही पदाधिका-यांनी कुलसचिव डाँ. अनिल हिरेखन यांची भेट घेवुन चर्चा केली तेव्हा डाँ. हिरेखन यांनी काढलेल्या परीपञकात दुरूस्ती करण्यास नकार दिला. म्हणुन आज संघटनेचे अध्यक्ष प्रशांत रंदई यांचे नेतृत्वात एका शिष्टमंडळाने कुलगुरू डाँ. प्रशांत बोकारे यांचेसह कुलसचिव डाँ. हिरेखन यांची भेट घेवुन सुट्ट्यां बाबतचे शासन परीपञक सादर केले. शिवाय प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांना दीर्घ अवकाश कालीन सुट्ट्या लागु नसतील तर त्याबाबतचे शासन परीपञक विद्यापीठाने संघटनेला द्यावे व दिर्घ अवकाश कालीन सुट्ट्या ऐवजी अर्जीत रजा लागु असतील तर त्याबाबतचा शासन निर्णय द्यावा म्हणजे त्यानुसार गोंडवाना विद्यापीठातील प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरणाचा लाभ घेता येईल. अशी मागणी केली. भेटीअंती कुलगुरू डाँ. प्रशांत बोकारे आणि कुलसचिव डाँ. अनिल हिरेखन यांनी संघटनेची मागणी मान्य करत शिक्षकेत्तर कर्मचारी संवर्गातील प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांना दिर्घ कालीन अवकाश सुट्ट्या मान्य करून त्याबाबतचे परीपञक प्रसारीत केले. याबद्दल संघटनेच्या वतीने कुलगुरू, कुलसचिव आणि विद्यापीठाच्या संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. यावेळी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष लोमेश दरडे, महासचिव अरूण जुनघरे, सल्लागार राममोहन ब्राडीया, गजानन काळे, विनोद चोपावार, विशाल गौरकर, रूपेश चिंचोळे आदी उपस्थित होते.