मूल : स्थानिक डाँ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयात विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, शैक्षणिक मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास या विषयांवर सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते,
कार्यशाळेचे उदघाटन बलारपूर नगर परिषद चे माजी अध्यक्ष तथा डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे केंद्रीय सचिव हरिशजी शर्मा यांनी केले, वाचनालयाचे अध्यक्ष तसेच धनश्री नागरी सहकारी पतसंस्था मुलचे अध्यक्ष अजय गोगुलवार यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यशाळेला अतिथी म्हणुन गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे , प्रा डॉ किरणताई कापगते, मुख्याध्यापिका सुनीता बुटे आदी उपस्थित होते, दीपप्रज्वलन आणि श्यामाप्रसाद मुखर्जी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यशाळेला सुरूवात झाली. सोहळा पार पडला. यावेळी हरिश शर्मा, ओमप्रकाश संग्रामे, डॉ प्रा किरण कापगते यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रवीण मोहूर्ले यांनी केले.,
कार्यशाळेच्या प्रथाम सत्रात नागपूर विज्ञान संस्थेच्या अधिकारी प्रा सौ मनीषा भडंग यांनी 10 आणि 12 वी नंतरच्या वेगवेगळे अभ्यासक्रम आणि परीक्षा पध्दाती बाबत मार्गदर्शन केले, द्वितीय सत्रात विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास या विषयावर गडचिरोली येथील डॉ प्रा राकेश चडगुलवार यांनी मार्गदर्शन केले, कार्यशाळेला शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, सूत्रसंचालन वाचनालयातील विद्यार्थी आत्राम यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री संजय मारकवार, प्रमोद कोकुलवार, प्रवीण मोहूर्ले चिमढा, सौ प्रणिता हेडाऊ तसेच जलतरण संघटनेच्या सदस्यांनी सहकार्य केले