मुल – तालुक्यातील चितेगाव जवळ ब्रेजा गाडीने दुचाकी वाहनाला मागच्या बाजुने जोरदार धडक दिल्याने पती पत्नी गंभिर जखमी झाल्याची घटना आज दुपारी दोन वाजताचे दरम्यान घडली. वसंत रावजी नरोटे, ललिता वसंत नरोटे रा. माडे आमगाव तालुका चामोर्शी असे जखमी झालेल्या पती पत्नीचे नाव आहे. जखमींना मूल येथिल उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून जखमींना पुढील उपचाराकरीता चंद्रपूर येथिल जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.धडक दिलेल्या ब्रेजा या चारचाकी वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी पती पत्नी हे आपल्या मुलाला भेटण्याकरीता सरडपार येथे जात होते. मुख्य मार्गावर चितेगांव जवळ एका ब्रेकरवर ब्रेक केला असता मागनु येत असलेली ब्रेजा या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.पुढील तपास पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय पंचबुद्धे आणि मुल पोलीस करीत आहे.
Latest article
नरभक्षक वाघाच्या दहशतीत असलेल्या ग्रामस्थांनी घेतली मुख्य वनसंरक्षकांची भेट, मागण्यांची पुर्तता न केल्यास आंदोलन...
*नरभक्षक वाघाच्या दहशतीत असलेल्या ग्रामस्थांनी घेतली मुख्य वनसंरक्षकांची भेट*
*मागण्यांची पुर्तता न केल्यास आंदोलन करू. संतोषसिंह रावत यांचा इशारा*
मूल : शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये दहशत पसरविणाऱ्या...
पंधरा दिवसात पाच जणांचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर वाघांचा बंदोबस्त करावा, संतोषसिंह रावत यांचा आंदोलनाचा...
मूल : पंधरा दिवसाच्या कालावधीत तालुक्यातील पाच जणांचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेला. त्यामूळे जनसामान्यांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली असून जीवघेण्या वाघांचा बंदोबस्त करावा. अशी...
श्रीकृष्ण हुड्डा यांची सेवानिवृत्त कर्मचारी सेलच्या सोनीपत विधानसभाध्यक्ष पदावर निवड
मूल : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत वाहन चालक पदावर सेवारत राहीलेले, बँकेचे विद्यमान अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचे एकेकाळचे...