मूल : (संजय पडोळे) ठराविक रक्कम दिल्यास बाजारपेठेत मिळते त्यापेक्षा दुप्पट सोन देतो, असे आमीष दाखवुन राजस्थान येथील एका भामट्याने तालुक्यातील बेंबाळ येथील काही लालची महाभागांची फसवणुक केल्याची घटना काही दिवसांपुर्वी घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
व्यवसायाच्या निमित्तानं गावोगावी फिरतांना तीन महीण्यापुर्वी राजस्थान येथील त्या भामट्याची बेंबाळ येथील विवेक नामक व्यक्तीशी भेट झाली. भेटी दरम्यान झालेल्या चर्चेत मासा गळाला लागतो याची खाञी झाल्या नंतर आपण सोन्याचा व्यवसाय करतो, बाजारपेठे पेक्षा ठराविक रक्कमेत दुप्पट शुध्द सोन विकत देतो. असे सांगुन विवेकला सोन घेण्याचा आग्रह करू लागला. भामट्याचा आग्रहाला बळी पडलेल्या विवेकला सुरूवातीस त्या भामट्याने विश्वास बसावा म्हणुन शुध्द सोन्याचे दोन मनी देत सोनारा कडुन खाञी करून घेण्याचा सल्ला दिला. त्या दोन मनीची सोनारा कडुन खाञी झाल्यानंतर विवेकला लालसा झाली. ठराविक रक्कमेत दुप्पट सोन विकत घेण्यासाठी विवेक आणि त्याच्या दोन सहका-यांनी राजस्थान येथील त्या भामट्याशी संपर्क साधला. झालेल्या संभाषणानुसार विवेक आणि त्याचा एक सहकारी ठरलेले वीस लाख रूपये घेवुन गोंडपिपरी येथे गेले. ठरलेल्या ठिकाणी भेट झाल्यानंतर विवेकने त्या भामट्याला वीस लाख रूपये देवुन दोन किलो सोन्याची बँग हाती घेतली, झालेल्या गुप्त व्यवहाराची चर्चा नको आणि पोलीसांनाही सुगावा लागु नये. या भितीपोटी विवेक आणि त्याचा सहकारी भामट्या सोनाराकडून मिळालेली बँग घेवुन बेंबाळला परतले. दुसऱ्या दिवशी सोन्याची ती बँग घेवुन मनी तपासलेल्या त्या सोनाराकडे खाञी करण्यासाठी गेले तेव्हा त्या निष्णात सोनाराने बँग मध्ये असलेली धातु सोने नसल्याचे सांगताच विवेक आणि त्याच्या मिञाच्या पायाखालची मातीच घसरली. वीस लाखाचा सौदा केलेल्या त्या भामट्याने फसविल्याचे समजताच विवेकने त्या भामट्याशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. त्या भामट्याशी संपर्क न झाल्याने शेवटी विवेक आणि त्याचा किशोर नामक मिञाने गोंडपिपरी गाठली. पण तो भामटा गोंडपिपरी मधुन केव्हाच पसार झाला होता. त्या भामट्याने आपली वीस लाखाने फसवणुक केल्याची खाञी झाल्यानंतर झालेल्या गुप्त व्यवहारात बदनामी होवु नये शिवाय पोलीसांचा ससेमीरा आपल्या पाठीमागे लागु नये म्हणुन विवेकने वाटमारीची घटना रंगवली. पत्नीसह मोटार सायकलने मूल कडे येत असतांना मूल ताडाळा दरम्यान मोटार सायकलने आलेल्या दोन युवकांनी आम्हाला मार्गात थांबविले. चाकुचा धाक दाखवुन पत्नीकडून पर्स हिसकावुन पळुन गेले. पर्स मध्ये अंदाजे ६ लाख रूपये किंम्मतीचे सोन्याचे दागीने होते, अश्या प्रकारची पोलीस स्टेशन मूल येथे तक्रार नोंदविली. दाखल तक्रारीवरून पोलीस स्टेशन मूलचे ठाणेदार सतिशासिंह राजपुत यांनी तपासाची चक्रे फिरविताच वाटमारीची घटना घडलीच नाही. असे उजेडात आले. ठाणेदार राजपुत यांनी विवेक आणि त्याच्या पत्नीची तपासणी करताच विवेक चक्रावुन गेला. शेवटी पितळ उघडे पडेल या भितीपोटी चोरीची घटना घडली नसल्याचे सांगुन घडलेली सत्यस्थिती सांगीतली. लवकर श्रीमंत होण्याच्या नादात विवेक आणि त्याच्या सहका-याने सोन्याच्या मोबदल्यात भामट्याला लाखो रूपये दिल्याचे सिध्द झाल्यानंतर प्रकरण अंगलट येवु नये म्हणुन शेवटी दिलेली वाटमारीची तक्रार मागे घेवुन वास्तविक घटनेची तक्रार दिली. तक्रारीनुसार चौकशी सुरू होताच दिलेले लाखो रूपये विवेक कडे कोठुन आले. याचा शोध सुरू झाल्याने विवेक आणि त्याचे सहकारी चांगलेच अडचणीत आले आहे. दरम्यान घडलेल्या सदर प्रकाराची चर्चा होताच काही मंडळींनी झालेल्या व्यवहारात दिलेल्या लाखो रूपयाची चौकशी व्हावी. अशी विनंती वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामूळे घडलेल्या सदर प्रकारात लाखो रूपयाचे घबाळ उजेडात येईल. अशी चर्चा आहे.
लाखो रूपयाच्या या घटनेत तालुक्यातील एक तलाठी आणि एक व्यवसायी सहभागी असुन हे दोन्ही जबाबदार व्यक्ती वेगवेगळ्या कारभारात तरबेज असल्याची चर्चा आहे