मूल शहरात काही ठिकाणी आनंदाचा शिधा मिळालाच नाही
लाभार्थी रिकाम्या हातानेच परतले,
नैराश्याचे वातावरण
मूल:- गरिबांची दिवाळी गोड व्हावी,म्हणून रेशनधारकांना शंभर रूपयांत रवा,साखर,चणाडाळ व तेल असा ‘आनंदाचा शिधा‘ देण्याचा निर्णय शासनाने घेतला.मात्र,दिवाळीचा दिवस उजाडूनही मूल शहरात काही परीसरातील अनेक लाभार्थ्यापर्यंत शिधा पोहोचला नाही. शिधा मिळेल म्हणून कार्डधारक तासनतास रांगेत राहिले.पण काहींना रिकाम्या पिशव्या घेऊन परतावे लागले.आवश्यक तेवढया शिधाकीट दुकाना पर्यंत पोहोचल्याच नव्हत्या. शिधामिळाला नसल्याने कार्डधारकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. त्यांच्यात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. काही रेशन दुकानदारांनाही लोकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. तर काही रेशन दुकानदार नागरीकांना तुम्हाचा शिधा आला नाही, फक्त तुम्ही तांदुळ 10 किलो तर गहु 2 किलो घेवून जा असे सांगितले जात आहे. आनंदाचा शिधा मिळाला कुणाला असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.